Japan Earthquakes : जपानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, 23 जण जखमी; टोकियोमध्ये अंधार

Japan Earthquakes : जपान पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, त्सुनामीचा धोका नसला तरी

Japan Earthquakes

Japan Earthquakes

Japan Earthquakes : जपान पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, त्सुनामीचा धोका नसला तरी राजधानी टोकियो आणि इतर अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. रविवारी सकाळी रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेच्या भूकंपामुळे 23 हून अधिक लोक जखमी झाले असून काही ठिकाणी घरे आणि इमारती कोसळल्याची देखील माहिती समोर येत आहे.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि जपान मेटिओरोलॉजिकल एजन्सी (JMA) च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण इबाराकी प्रांताच्या खाली 70 किलोमीटर (42 मैल) खोलीवर होता. भूकंपामुळे सायतामामध्ये 9, कानागावामध्ये 9, चिबामध्ये 4 आणि इबाराकी शरहात 1 व्यक्ती जखमी झाली. लोक झोपेत असतानाच भूकंप झाल्यामुळे अनेकांची अचानक जाग झाली आणि घबराटीत घराबाहेर पडताना त्यांना दुखापत झाली. भूकंपाच्या वेळी लोकांच्या घरातील खिडक्या आणि छताचे पंखे हलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

भूकंपानंतर पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी देशाला संबोधित करत बचाव पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच टोकियो आणि नारिता विमानतळ दरम्यान धावणाऱ्या ‘ईस्ट जपान रेल्वे’च्या एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. ‘टेप्को पॉवर’च्या (TEPCO Power) ग्रीडमधील बिघाडामुळे टोकियोमधील 450 हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

बीड मातीच्या कतृत्वाचा सुगंध पुन्हा दिल्लीपर्यंत; डॉ. कविता गित्ते यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड-

Exit mobile version