पहिल्यांदा भेट अन् नंतर प्रेम, टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने सांगितली त्याची लव्ह स्टोरी

  • Written By: Published:
पहिल्यांदा भेट अन् नंतर प्रेम, टोकियो ऑलिंपिक चॅम्पियन नीरज चोप्राने सांगितली त्याची लव्ह स्टोरी

Neeraj Chopra Love Story : भारतासाठी टोकियो ऑलिंपिक-2020 (Tokyo Olympics-2020) मध्ये भालाफेकमध्ये (Javelin Throw) सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नीरज नुकताच विवाहबद्ध झाला आणि त्याने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर आता एका मुलाखतीमध्ये त्याने त्याची लव्ह स्टोरी उघड केली आहे.

16 जानेवारी रोजी नीरजने त्याची प्रेयसी हिमानी मोरशी (Himani Mor) लग्न केले आहे. या लग्नात नीरजचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मात्र लग्नापूर्वी बऱ्याच काळापासून नीरज आणि हिमानी एकमेकांना ओळखत होते अशी माहिती नीरजने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

स्पोर्ट्स टुडेशी बोलताना नीरज म्हणाला की, हिमानीचा कुटूंब देखील स्पोर्ट्सशी जुडले आहे. त्यामुळे आमची अनेक वेळा भेट होत होती. येथूनच आमची लव्ह स्टोरीची सुरुवात झाली आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावेळी नीरज म्हणाला की, मी तिला आधीपासून ओळखत होतो. ती अशा कुटुंबातून येते ज्यांचे खेळाशी नाते आहे. तिचे पालक कबड्डी खेळाडू आहेत. तर भाऊ बॉक्सर होते. ती स्वतः टेनिस खेळायची, पण दुखापतीमुळे तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. तसेच दोन्ही कुटुंब स्पोर्ट्सशी जोडले गेल्याने आम्ही एकमेकांना नियमितपणे भेटायचो नंतर आम्ही प्रेमात पडलो असं त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

नीरजच्या लग्नात खूप कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. या पाठीमागचं कारण देखील त्याने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तो म्हणाला की, 2025 च्या हंगामासाठी सराव सुरू करण्यापूर्वी त्याला लग्न करायचे होते आणि लग्नाबद्दल खूप कमी लोकांना माहिती होते. फक्त मित्र आणि कुटुंबाला माहिती होते. मला 2025 च्या हंगामासाठी सराव सुरू करायचे होते. सर्वांना आमंत्रित करण्यासाठी खूप वेळ गेला असता त्यामुळे आम्ही लग्न कमी लोकांमध्ये करण्याचा निर्णय घेतला मात्र लवकरच एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि या कार्यक्रमात आम्ही सर्वांना आमंत्रित करणार अशी माहिती देखील नीरजने या मुलाखतीमध्ये दिली.

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube