गोल्डन बॉय नीरज चोप्राला मानाचं पद.. टेरिटोरियल आर्मीत बनला लेफ्टनंट कर्नल

गोल्डन बॉय नीरज चोप्राला मानाचं पद.. टेरिटोरियल आर्मीत बनला लेफ्टनंट कर्नल

Neeraj Chopra : सुवर्णपदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) लेफ्टनंट कर्नलची मानद रँक प्रदान करण्यात आली आहे. साप्ताहिक सार्वजनिक पत्रिका आणि केंद्र सरकारच्या गॅझेटनुसार नीरज चोप्राची नियुक्ती 16 एप्रिल 2025 पासून प्रभावी झाली आहे. केंद्र सरकारच्या गॅझेटनुसार प्रादेशिक सेना विनियम 1948 मधील परिच्छेद 31 नुसार प्रदत्त अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदाची रँक प्रदान करत आहे.

नीरजने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले होते. ऑलिम्पिकमधील ट्रॅक अँड फील्ड इवेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. यानंतर नीरजने 2024 मधील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीमने सुवर्णपदक जिंकलं होतं. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ब्राँझ पदकाची कमाई केली होती.

“मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की..” पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रणावरून ट्रोल झाल्यानंतर नीरजचं वक्तव्य

2016 मध्येच आर्मी जॉइन

हरियाणाचा रहिवासी असलेला नीरज याआधी भारतीय सैन्यात सुभेदार मेजर या पदावर तैनात होता. सैन्यात असतानाच उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला विशिष्ट सैन्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. नीरज सर्वात आधी 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय सैन्यात नायब सुभेदार पदावर ज्यूनियर कमिशंड अधिकारी म्हणून भरती झाला होता. नंतर 2021 मध्ये सुभेदार या पदावर बढती मिळाली. 2022 मध्ये पुन्हा प्रमोशन घेऊन नीरज सुभेदार मेजर झाला होता.

पाकिस्तानी नदीमला आमंत्रण अन् नीरज ट्रोल

नीरजने पाकिस्तानी खेळाडू अरशद नदीमला भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु, पहलगाम येथे झालेला हल्ला पाहता यात पाकिस्तानचाच हात असल्याचे समोर आले होते. या घटनेत निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने देशभरात संताप धुमसत आहे. अशा परिस्थितीत नीरजने एका पाकिस्तानी खेळाडूला भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याने संताप व्यक्त केला गेला होता. लोकांनी नीरला चांगलच सुनावलं होतं. यानंतर या सगळ्या प्रकारावर नीरजने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली होती.

याबाबतीत नीरज म्हणाला होता की अरशदला मी दिलेलं निमंत्रण एका अॅथलीटकडून दुसऱ्या अॅथलीटला दिलं गेलेलं निमंत्रण होतं. माझ्या दृष्टीने देशाचं हित सर्वोच्च आहे. मी शक्यतो जास्त बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या विरुद्धही बोलणार नाही. ज्यावेळी माझं देशप्रेम आणि माझ्या परिवाराच्या सन्मानाची गोष्ट असेल त्यावेळी मी नक्कीच बोलणार. माझ्यासाठी देशाचे हित सर्वोच्च राहील. दहशतवादी हल्ल्यात ज्या लोकांनी त्यांचे स्वजन गमावले त्यांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. मला विश्वास आहे की आपल्या देशाची प्रतिक्रिया एक राष्ट्राच्या रुपात आपली ताकद दाखवील.

भारताच्या गोल्डन बॉयचा चाहत्यांना सुखद धक्का; भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनात

follow us
  • fb
  • instagram
  • youtube