मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

  • Written By: Published:
मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणात माजी आमदार हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात

Harshvardhan Jadhav : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना आज नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) ताब्यात घेतले आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन जाधव उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर नागपूर पोलीस त्यांना अटक करणार आहे. जुन्या प्रकरणात त्यांच्या विरोधात वॉरंट न्यायालयाने जारी केला होता मात्र तरी देखील ते न्यायालयात हजर राहिले नसल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याचे हे प्रकरण आहे.

नेमकं प्रकरण काय?

2014 मध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नागपूर दौऱ्यावर होते. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना नकार दिला होता तेव्हा पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता. यानंतर त्यांच्याविरोधात 353 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर होत नव्हते. त्यानंतर न्यायालयाचे निर्देशानुसार त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले होते आणि आज ते नागपूरात न्यायालयात उपस्थित झाल्यावर न्यायालयाने नागपूर पोलिसांना हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्याचे आदेश दिले आहे.

रुग्णालयात दाखल

सध्या हर्षवर्धन जाधव यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र त्यावेळी त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली त्यामुळे त्यांना पुढील 24 तास डॉक्टरांच्या देखरेखे खाली ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांनी दिली आहे.

महायुतीत पुन्हा धुसफूस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार शक्तिप्रदर्शन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube