महायुतीत पुन्हा धुसफूस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार शक्तिप्रदर्शन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  • Written By: Published:
महायुतीत पुन्हा धुसफूस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार शक्तिप्रदर्शन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eknath Shinde : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) धुसफूस सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच वैद्यकीय गरजवंतांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष असताना देखील शिंदेंनी मोठा निर्णय घेत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरु केला आहे. त्यामुळे या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय पातळीवर शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्याकाही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह महाकुंभमेळाव्याला (Mahakumbh Mela) जाऊन पवित्र स्नान केलं आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे देखील आपले सर्व आमदार (MLA) आणि खासदारांसह (MP) महाकुंभात जाणार आहे. सर्व आमदार आणि खासदारांसह शिंदे महाकुंभात जाणार असल्याने ते राष्ट्रीय पातळीवर मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदार असून 57 आमदार आहे.

माहितीनुसार, शिवसेनेनं राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळेच आता शिंवसेनेकडून राज्याबाहेर सदस्यता नोंदणी अभियान सुरु केला आहे. शिवसेनेनं उत्तर भारतावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळेच शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह प्रयागराजचा दौरा करणार आहे.

आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला

याबाबत माहिती देताना शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेच पुढे नेत आहेत. शिवसेना हिंदुत्त्ववादी पक्ष आहे. त्यामुळेच आम्ही प्रयागराजला जाणार आहोत. एकनाथ शिंदे धार्मिक आहेत. यंदाचा महाकुंभमेळा विशेष आहे. असा योग 144 वर्षांनी जुळून आला आहे. ज्यांनी हिंदुत्त्व सोडलं, त्यांना आपण हिंदुत्त्ववादी आहोत ही बाब सतत सांगावी लागते पण आम्हाला त्याची गरज नाही असं देखील मनिषा कायंदे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube