संवादच तोडून टाकायचा का ? शेवटी धनंजय मुंडे हे देखील मंत्री….देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

Devendra Fadanvis On Suresh Dhas and Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या मागे हात धुवून लागणारे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धसांनी (Suresh Dhas) त्यांची दोनदा भेट घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अनेक दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्या भेटीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या भेटीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर होते. धस-मुंडे भेटीवर ते म्हणाले, फडणवीस कोण-कुणाला भेटले यावर अशा प्रकारणे राजकारण होणार असेल लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात खंबीर भूमिका घेतलेली आहे. ती सर्वांनी बघितली आहे. पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही. शेवटी धनंजय मुंडे हे देखील मंत्री आहेत.
एखादा आमदार मंत्र्याला भेटला म्हणून काही फरक पडत नाही. शेवटी सुरेश धसांनी हे सांगितले आहे, भेट घेतली तरी हेतू एकच आहे. कुठल्याही परिस्थितीत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा हेतू घेऊन ते काम करित आहेत. ते पुढाकार का घेत आहे, त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुख:त आहे, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे.
मुंडेंच्या राजीनाम्याचं बिल आपल्यावर फाटू नये म्हणून अजितदादांची सावध भूमिका; ठाकरे गटाचे टीकास्त्र
मी मूर्खांना उत्तर देत नाही-फडणवीस
ठाकरे सेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे मध्यंतरी इडीवर बोलले होते. इडीला दोन तास आमच्या हातात दिली, तर अमित शहा हेही मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असे राऊत म्हणाले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, मूर्खांना मी उत्तर देत नाही.