Dhananjay Munde: मोठी बातमी! धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती

Dhananjay Munde: मोठी बातमी! धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची माहिती

Dhananjay Munde Resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी थेट धनंजय मुंडेवर आरोपांची राळ उठवली. सध्या त्यांनी चहूबाजूंनी कोंडी झाल्याची परिस्थिती पाहायला मिळते आहे. अनेकांनी तर या हत्येशी थेट त्यांच संबंध जोडला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यांच्यातही चर्चा झाली. परंतु, अद्याप हा निर्णय सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा अन् ; दमानियांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

आवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याने तसेच खंडणीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. मात्र, धनंजय मुंडे यांनी सोमवारी रात्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपविल्याची माहिती आहे.

विरोधक आणि महत्त्वाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे मी व्यथित झालो आहे, असं नमूद करून धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेअंती राजीनामयासंदर्भातील निर्णय राखून ठेवल्याची माहिती आहे. दरम्यान, सागर बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून तडक निघून जाणे पसंत केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube