जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा अन् …; दमानियांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण लावून धरले आहे. आता पु्न्हा एकदा त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी केली. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा, असं त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडमुळेच पंकजा मु्डेंचा लोकसभेला पराभव, सुरेस धसांचा गौप्यस्फोट
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निवटवर्तीय वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, अद्यापही मुंडेंवर काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दमानिया यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बीड हत्या प्रकरणावर बोलतांना त्या म्हणाल्या की, मी सिंचन घोटाळ्याबाबत आरोप केला तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून राजीनामा द्यावा, ते जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं, असंही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी छगन भुजबळांवरही टीका केली. सगळेच एकाच माळेचे मणी आहेत. छगन भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मुंडेंनी त्यांना पाठीशी घातले होते. आता भुजबळ मुंडेंना पाठीशी घालून परतफेड करतायतं, असंही दमानिया म्हणाल्या.
एसआयटीत सगळे अधिकारी जिल्हाबाहेरील असावे
माझ्यावर अश्लील भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. महिलांना बेअब्रू केले जात असेल तर हे खपवले जाणार नाही, असा इशारा देत फडणवीस यांनी संतोष देशमुख प्रकरणातील एसआयटी खंडीत करावी आणि एसआयटीत सगळे अधिकारी जिल्हाबाहेरील असावे, असंही दमानिया म्हणाल्या.
मुंडेंकडून चौकशी प्रभावीत- आव्हाड
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय, पण त्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावं आणि योग्य कारवाई करावी. या हत्या प्रकरणात सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीमधून पीएसआय महेश विघ्ने याची उचलबांगडली केली. तो चौकशी प्रभावित करेल असं असं तुम्हाला वाटतं. मग मुंडे सत्तेत राहिले तर ते चौकशी प्रभावित करणार नाहीत का? असा सवाल आव्हाड यांनी केला.
मुंडे मास्टराइंट – संभाजीराजे
या सगळ्याचा मास्टरमाईंड बॉस धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडेंनी आधी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे, असं म्हणत मुंडेंना अजित पवार संरक्षण का देत आहे?, असा सवाल संभाजीराजेंनी केला.