धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ; अंजली दमानियांचे पुरावे देत गंभीर आरोप

धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ; अंजली दमानियांचे पुरावे देत गंभीर आरोप

Anjali Damania : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. (Anjali Damania) यानंतर वंजारी समाज यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपला प्रचंड मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

परळीत पोलीस प्रमुख, तहसीलदार अन् गटविकास अधिकारीही वंजारीच, मुंडेंकडून फक्त वापर दमानियांचा आरोप

मी दोन विधानं केली होती. बीड जिल्ह्यात उच्चपदांवर वंजारी समाजाचे लोक आहेत, असं बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं. बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही. ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले होते. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू, आळशी आहे, असं मी कुठेही म्हंटलं नाही. समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले. सानप, मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहिलं देखील होतं आणि दाखवलं होतं.

धनंजय आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर

वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय, यात शंका नाही. शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट दाखवले दमानिया यांनी दाखवल.

चौथा दिवसांपासून धमक्यांचे कॉल

त्या पुढे म्हणाल्या की, अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली. नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकलाय, फोन उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागलेत. सुनिल फड यांनी देखील तसंच केले आहे. खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. मला पहिल्या दिवशी 700-800 कॉल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाहीत. हे सगळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा, त्यांनी केलाय.

 

-प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी मुंबई

follow us
  • fb
  • instagram
  • youtube