दिल्लीला 18 फेब्रुवारीला मिळणार नवा मुख्यमंत्री, CMच्या नावावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब..
![दिल्लीला 18 फेब्रुवारीला मिळणार नवा मुख्यमंत्री, CMच्या नावावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब.. दिल्लीला 18 फेब्रुवारीला मिळणार नवा मुख्यमंत्री, CMच्या नावावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब..](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-Chief-Minister_V_jpg--1280x720-4g.webp)
Swearing in ceremony of Delhi Chief Minister : दिल्लीमध्ये (Delhi) भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर आता नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या (Delhi Chief Minister) शपथविधीचा १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता राजधानीतील रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) होणार असल्याची माहिती आहे. त्याआधी सोमवारी (१७ फेब्रुवारी) भाजप (BJP) विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजप अडीच दशकांनंतर पुन्हा सत्तेत आला. तर आम आदमी पक्षाची विजयाची हॅट्रिक हुकली. दुसरीकडे, काँग्रेसने शून्याची डबल हॅटट्रिक केली. एकूण ७० जागांपैकी भाजपने ४८ जागा जिंकल्या. तर आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया सारखे मोठे नेते पराभूत झाले आहेत. या विजयामुळे भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. मात्र, निवडणूक निकालानंतर आठवडा उलटूनही भाजपने मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झालेलं नाही.
आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक
दरम्यान, भाजपने सोमवारी (१७ फेब्रुवारी) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्रीपदाचा सस्पेंस सोमवारी संपेल. सर्व आमदारांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल आणि पुढील पाच वर्षांसाठी दिल्लीची कमान कोणाकडे सोपवली जाईल, हे स्पष्ट होईल.
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार कोण आहेत?
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. याशिवाय, कालकाजीमधून माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्यकडून पराभूत झालेले रमेश बिधुरी यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. तसेच भाजप खासदार मनोज तिवारी, कपिल मिश्रा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि विजेंद्र गुप्ता यांच्याही नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पक्ष श्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, की अन्य राज्यांप्रमाणे दिल्लीतही धक्कातंत्र वापरलं जातं, हेच पाहणं महत्वाचं आहे.