आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक

  • Written By: Published:
आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक

IPL 2025 schedule with match dates and venues : इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे बिगूल वाजलं आहे. यंदाचा हा आयपीएलचा १८ वा हंगाम असणार आहे. गेल्या तीन वर्षांप्रमाणेच यंदाही (IPL) आयपीएलमध्ये १० संघ स्पर्धा करताना दिसणार असून ७४ सामन्यांचा हा हंगाम असणार आहे. आज रविवारी (१६ फेब्रुवारी) या हंगामाचे वेळापत्रक घोषित करण्यात आलं आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धा शनिवारी, २२ मार्चला सुरू होणार आहे. अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या हंगामातही डबल हेडर (एकाच दिवशी दोन सामने) खेळवण्यात येणार आहे. या हंगामाचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळला जाईल. केकेआरच्या घरच्या मैदानात इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना रंगेल.

IPL 2025 : ठरलं! आयपीएलचा थरार  दिवसापासून रंगणार, BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी, २३ मार्च सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघात हैदराबादमध्ये दुपारी सामना होईल, तर त्याचदिवशी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना चेन्नईला रंगेल. चेन्नई विरुद्ध मुंबई या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये २० एप्रिलला देखील सामना होईल. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होईल.

यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे एकदाच आमने-सामने येणार आहेत. हा सामना ७ एप्रिलला होईल. तसेच चेन्नई सुपर किंग्स त्यांचे पहिले चार सामने घरच्या मैदानात खेळणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी ९ मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर १२ दिवसातच आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात होणार आहे. एकूण १२ ठिकाणी आयपीएलचा १८ वा हंगाम खेळला जाणार आहे. तसेच नेहमीप्रमाणे होम आणि अवे प्रकारात हा हंगाम होईल. राजस्थान रॉयल्स त्यांचे दोन घरचे सामने गुवाहाटीला खेळणार आहे. तसेच पंजाब किंग्स त्यांचे दोन घरचे सामने धरमशाला येथे खेळणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या