न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; IPLमधूनही माघार
Wriddhiman Saha Announces Retirement from all forms of cricket : भारतीय क्रिकेट (cricket) संघातून बऱ्याच दिवसांपासून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केलीय. साहा बराच काळ भारताच्या कसोटी संघाचा (latest cricket news) भाग होता, परंतु नंतर फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत साहाने नुकताच झालेला सामना हा त्याचा शेवटचा सामना असल्याचं जाहीर केलंय. डिसेंबर 2021 मध्ये साहाने मुंबईत शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
मोठी बातमी! फटाके फोडताना 100 जण जखमी, 32 लहान मुलांचा समावेश
साहाने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय की, “क्रिकेटमधील संस्मरणीय प्रवासानंतर हा सीझन माझा शेवटचा असेल. बंगालचे प्रतिनिधित्व करत रणजी ट्रॉफीमध्ये शेवटच्या वेळी खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार, तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला हा सीझन संस्मरणीय बनवूया…”
आज राज्यभरात बंडखोरांची मनधरणी; 3 वाजेपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत, कोणत्या पक्षात काय स्थिती?
गेल्या महिन्यात 40 वर्षांचा झालेला साहा भारतासाठी 40 कसोटी आणि 9 एकदिवसीय सामने खेळला आहे. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर, साहा बराच काळ भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत साहा दुसऱ्या स्थानावर आहे. धोनी आणि पंत पहिल्या स्थानावर आहेत. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक मानल्या जाणाऱ्या साहाने आपल्या कारकिर्दीत 1353 कसोटी धावा केल्या आणि तीन शतके झळकावली.
After a cherished journey in cricket, this season will be my last. I’m honored to represent Bengal one final time, playing only in the Ranji Trophy before I retire. Let’s make this season one to remember! pic.twitter.com/sGElgZuqfP
— Wriddhiman Saha (@Wriddhipops) November 3, 2024
साहाने तीन वर्षांपूर्वी डिसेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. त्याने पहिल्या डावात 27 तर दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी साहाला बाहेरचा रस्ता दाखवत ऋषभ पंतचा बॅकअप म्हणून केएस भरतची निवड केली होती. वृद्धिमान साहाचं इंटरनॅशनल करिअर 2010 मध्ये सुरू झालं होतं. तेव्हा त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळाली होती. न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर काही तासांतच साहाने निवृत्तीची घोषणा केलीय.