पवारांचा गुगली शेजाऱ्याल्याही कळत नाही पण ते माझ्यावर कधीही गुगली टाकत नाही – एकनाथ शिंदे

पवारांचा गुगली शेजाऱ्याल्याही कळत नाही पण ते माझ्यावर कधीही गुगली टाकत नाही – एकनाथ शिंदे

Eknath Shinde on Sharad Pawar at Delhi : शरद पवार यांनी मला कधीही गुगली टाकली नाही आणि यापुढेही ते टाकणार नाहीत. असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

शिंदेंनी ठाण्याच्या राजकारणाला दिशा दिली; दिल्लीत शरद पवारांकडून एकनाथ शिंदेवर स्तुतीसुमनं

शरद पवार यांचे सासरे सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे तर शरद पवार हे राजकारणात गुगली टाकतात. त्यांची गुगली कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांनाही कळत नाही पण माझा अनुभव वेगळा आहे. माझे पवार साहेबांशी प्रेमाची आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकली आहे. यापुढेही ते टाकणार नाहीत. असं वक्तव्य राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

EVM मधून डेटा डिलीट करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

त्याचबरोबर या पुरस्काराबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करताना शिंदे म्हणाले की महदजी शिंदे पुरस्काराने मला गौरविण्यात येत आहे. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण शिंदे यांनी पानिपत मध्ये पराभव झाल्यानंतर अवघ्या दहा वर्षात दिल्लीवर भगवा फडकवला होता. याच गोष्टीला काल 10 फेब्रुवारी रोजी तब्बल 254 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्यांचे कर्तुत्व लोकांसमोर आलं पाहिजे. असं म्हणत या पुरस्कारानंतर शिंदेंनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान या कार्यक्रमात आज एकनाथ शिंदे यांचा सन्मान होत आहे. ते सांगतात की, आम्ही सर्व सातारच्या आहोत. शिंदे जेव्हा ठाणे महानगरपालिकेमध्ये सभापती होते. तेव्हा शिंदेंनी ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube