आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला

  • Written By: Published:
आता गडकरी राष्ट्रवादीत येणार असं म्हणू नका, जयंत पाटलांचा पत्रकारांना टोला

Jayant Patil On Nitin Gadkari : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधील (MVA) अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये (Mahayuti) प्रवेश केला आहे तर काहीजण करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशीच काही चर्चा गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबद्दल देखील सुरु आहे. या चर्चांनुसार जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे मात्र आता जयंत पाटील यांनी आज या प्रकरणात बोलताना पत्रकारांना टोला लावला आहे. ते आज सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये राजारामबापू इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि व्यायाम शाळा हॉलचं (International student hostel and gym hall at Rajarambapu Institute) उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये राजारामबापू इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि व्यायाम शाळा हॉलचं उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, माझी पत्रकारांना विनंती आहे की, आता नितीन गडकरी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालवू नका. कारण गेल्या काही दिवसांपासून अशाच चर्चा सुरु आहे. त्यावर आता नामंकित पत्रकार देखील बोलू लागले आहे, याचं मला आश्वर्य वाटतं. दोन वेगवेळ्या पक्षातील लोक चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, अशीच पत्रकारांची धोरण झालेली दिसत आहे, हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

जयंतराव माझे चांगले मित्र : नितीन गडकरी

तर या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आजचा कार्यक्रम राजकीय नाही जयंतराव माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी आलो आहे. आमचे राजकीय विचार वेगळे आहे पण मन भिन्नता नाही. जयंत पाटील यांनी या पुढे कृषी क्षेत्रात काम कराव.

Maruti Grand Vitara 7 Seater ‘या’ दिवशी बाजारात होणार लाँच ; जाणून घ्या फिचर्ससह सर्वकाही…

कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात आलं की नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले. तसेच पेठ ते सांगली रस्ता खूप खराब होता, तीन-चार वर्षात मी यासाठी खूप शिव्या खाल्ल्या. आता या रस्त्याचं 80 टक्के काम पूर्ण झाल आहे, दर्जा सुद्धा उत्तम आहे. असेही यावेळी ते नितीन गडकरी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube