आघाडीत होणार बिघाडी? उद्धव ठाकरेंना काँग्रेस देणार मोठा झटका, राजकीय वर्तुळात चर्चा

Clashes In Congress And Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला असला, तरीही वरवर महाविकास आघाडी टिकून आहे. मात्र, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, परंतु त्यांची मुदत येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे.
काँग्रेसचा विधान परिषदेतील दावा
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या काँग्रेसकडे विधान परिषदेत सर्वाधिक आठ सदस्य आहेत, तर ठाकरे गटाकडे सात आणि शरद पवार गटाकडे दोन सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने हे पद मागितले आहे.
17 बॅट, 27 बॅग आणि अडीच क्विंटल सामान…’त्या’ स्टार क्रिकेटरसाठी BCCIने मोजले लाखो रुपये
विधानसभेतील स्थिती आणि काँग्रेसचा तर्क
विधानसभेत महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदार शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडे आहेत. ठाकरे गटाचे 20, काँग्रेसचे 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळू शकते, असा अंदाज आहे. जर विधानसभेत ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळाले, तर विधान परिषदेमध्ये काँग्रेसने हे पद मागणे स्वाभाविक असल्याचा काँग्रेसचा युक्तिवाद आहे.
आघाडीत तणाव वाढणार?
विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चेचे सत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, काँग्रेसने ठाम भूमिका घेतल्यास महाविकास आघाडीतील तणाव वाढू शकतो.
Video : 99 हजारात अनलिमिटेड, 151 पाणीपुरी खाल्यास खास बक्षीस; नागपूरच्या विक्रेत्याची जगभरात चर्चा
विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी
काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली आहे. विजय वडेट्टीवार यांना विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वडेट्टीवार यांना यापूर्वी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा अनुभव आहे, त्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेईल, असे मानले जात आहे.
विधान परिषद सदस्यसंख्या आणि निवड प्रक्रिया
30 सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकरणांमार्फत निवडले जातात. 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून निवडून येतात. 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात. राज्यपालांकडून 12 सदस्यांची नियुक्ती केली जाते. आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष लागलंय. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत विधान परिषदेतील राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.