Video : 99 हजारात अनलिमिटेड, 151 पाणीपुरी खाल्यास खास बक्षीस; नागपूरच्या विक्रेत्याची जगभरात चर्चा

Video : 99 हजारात अनलिमिटेड, 151 पाणीपुरी खाल्यास खास बक्षीस; नागपूरच्या विक्रेत्याची जगभरात चर्चा

Nagpur Panipuri Seller Offer Viral : आतापर्यंत तुम्ही एलआयसी, मोबाईल बॅलन्स, दोन-वर एक जीन्स फ्री अशा अनेक ऑफर्स ऐकल्या असतील. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं की, पाणीपुरीवर ऑफर आहे. तर तुमचा विश्वास बसेल का? शिवाय पाणीपुरी (Pani Puri) खाल्ल्यानंतर तुम्हाला बक्षिस मिळालं तर? काय अशक्य वाटतंय ना? पण हे खरंय…नागपुरातील एक विक्रेतात 151 पाणीपुरी खाल्ल्यास मोठं बक्षीस देतोय, बरं का. आपल्याकडं स्ट्रीट फूड्‍स (Streer Food) हा सर्वांच्याच आवडीचा विषय. त्यात पाणीपुरी म्हटलं की, विषयच संपला. लहान मूल असो वा मोठे, महिला असो वा पुरूष, पाणीपुरी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. यातच नागपूरमध्ये (Nagpur) पाणीपुरी प्रेमींसाठी एक अनोखी ऑफर सुरू आहे, ज्यात लाईफटाईम अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळणार आहे.

जर पाणीपुरी प्रेमींना आयुष्यभर अनलिमिटेड पाणीपुरी खायला मिळाली तर? यापेक्षा दुसरं सुख कोणतं असूच शकत नाही. याचाच विचार करत नागपूरच्या एका विक्रेत्याने पाणीपुरी प्रेमींसाठी भन्नाट ऑफर आणलीय. जिने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या ऑफर अंतर्गत, जर एखाद्या ग्राहकाने एकदा 99 हजार रुपये भरले, तर तो आयुष्यभर अमर्यादित पाणीपुरीचा आनंद घेऊ शकतो. या अनोख्या ऑफरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय.

‘एलन मस्क 13 मुलांचे वडिल’… 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला जन्म दिलाय, एका प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा दावा

या ऑफरमुळे दुकानदाराला निश्चितच प्रचंड प्रसिद्धी मिळालीय. अशी अनोखी ऑफर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोख्या आणि आकर्षक ऑफर्स देणं हा मार्केटिंग क्षेत्रात एक सामान्य ट्रेंड बनला आहे. नागपूरमधील एका पाणीपुरी विक्रेत्याने एक अनोखी ऑफर आणलीय. त्याने दावा केलाय की, 99 हजार रूपये भरा आणि आयुष्यभर मोफत पाणीपुरी खा. विक्रेत्याच्या या करारांतर्गत, ग्राहक सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर कधीही स्टॉलवर येऊ शकतात आणि मोफत पाणीपुरी खाऊ शकतात.

विजय मेवालाल गुप्ता, असं या पाणीपुरी विक्रेत्याचं नाव आहे. त्यांनी ही भन्नाट ऑफर देण्यामागील कारण स्पष्ट केलंय. ते म्हणतात की, आपल्याकडे एक रूपयापासून 99 हजारांपर्यंत अन् एक दिवसापासून लाईफटाईम अशी ऑफर आहे. आमच्याकडं सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी ऑफर आहे. 1 रूपयाची महाकुंभ ऑफर ही एकावेळी 40 पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी आहे. तर लाडक्या बहि‍णींसाठी 60 रूपयात अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर आहे. त्यांच्याकडे लाईफटाईम सोबतच विकली, मंथली, वार्षिक अशा ऑफर सुद्धा आहेत. यामध्ये तुम्ही पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी अनलिमिटेड खावू शकता.

“धस, मुंडे अन् कराड एकाच नाण्याच्या बाजू, स्वार्थासाठी त्यांची..”, धस-मुंडे भेटीवर राऊत कडाडले

माझ्या ऑफर्सला भन्नाट प्रतिसाद मिळतोय. 99 हजार रूपयांची ऑफर आतापर्यंत अमित साहू आणि आकाश अशा दोन लोकांनी घेतलेली आहे. ग्राहकांना ही आमची ऑफर आवडत आहे. भविष्यात जी महागाई वाढणार आहे, त्याचा विचार करून आम्ही आमच्या ग्राहकांसाठी या ऑफर आणल्या आहेत. या ऑफर्सवर डिस्काउंट सुद्धा देत आहोत. या ऑफर्स दिल्यापासून आमचा धंदा वाढलाय, असं देखील विजय गुप्ता यांनी स्पष्ट केलंय. एखाद्या ग्राहकाने एकाच वेळी 151 पाणीपुरी खाल्ल्या तर त्याला 21 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. ऑफर्स व्हायरल झाल्यापासून ग्राहकांनी दुकानावर गर्दी केल्याचं विजय गुप्ता सांगत आहेत.

त्याचं दुकान हे सोमवार ते शनिवार या काळात मेट्रो स्टेशन शेजारील वर्धा रोडवर असतं. विजय गुप्ता हे उत्तर प्रदेशमधील जौनपूरचे रहिवासी आहेत. आजोबांच्या काळापासून नागपुरात आम्ही हा व्यवसाय करतोय, असं त्यांनी सांगितलंय. यावर एका ग्राहकाने सांगितलंय की, त्यांची भेळपुरी, पाणीपुरी, दहीपुरी खूप भारी असते. आम्ही दर दोन दिवसाला त्यांच्याकडे येतो. त्यामुळे 195 रूपयांची ऑफर आम्हाला परवडते. मी त्यांच्याकडे तब्बल 15 वर्षांपासून ग्राहक आहे. तर दुसऱ्या एका ग्राहकाने सांगितलंय की, इन्स्टाग्रामवर त्यांची पोस्ट पाहून आम्ही इकडे आलोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube