‘एलन मस्क 13 मुलांचे वडिल’… 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला जन्म दिलाय, एका प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा दावा

‘एलन मस्क 13 मुलांचे वडिल’… 5 महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाला जन्म दिलाय, एका प्रसिद्ध इन्फ्लुएंसरचा दावा

Elon Musk One More Baby Influencer Ashley ST Clair Claims : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आहेत. ते एक्सचे संस्थापक, टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ आहेत. 53 वर्षीय एलन मस्क (Elon Musk) हे 12 नव्हे तर 13 मुलांचे वडील आहेत. नुकतंच एका महिलेने त्यांच्या मुलाला जन्म दिल्याचा दावा केलाय. हा दावा कंझर्व्हेटिव्ह इन्फ्लुएंसर आणि लेखिका ऍशले सेंट क्लेअर हिने (Influencer Ashley ST Clair) केलाय. तिने तिच्या एक्स हँडलवर एक पोस्ट लिहिली अन् जगासमोर कबूल केलंय की, तिने 5 महिन्यांपूर्वी ज्या बाळाला जन्म दिला त्याचे वडील एलन मस्क आहेत. ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“धस, मुंडे अन् कराड एकाच नाण्याच्या बाजू, स्वार्थासाठी त्यांची..”, धस-मुंडे भेटीवर राऊत कडाडले

सेंट क्लेअरने तिच्या पोस्टला ‘अलेआ इयाक्टा एस्ट’ असं कॅप्शन दिलंय. ज्याचा अर्थ ‘फासे तयार आहेत’ असा होतो. तिने पोस्टमध्ये लिहिलंय की, 5 महिन्यांपूर्वी मी या जगात एका नवीन बाळाचे स्वागत केलं. एलन मस्क त्याचे वडील (Elon Musk News) आहेत. माझ्या मुलाच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी मी हे आधी उघड केले नव्हतं. परंतु अलिकडच्या काळात हे स्पष्ट झालंय की, टॅब्लॉइड मीडिया ते उघड करण्याचा विचार करतेय, त्यामुळे कितीही नुकसान झाले तरी चालेल.

माझ्या मुलाला सामान्य आणि सुरक्षित वातावरणात वाढवायचे आहे. या कारणास्तव, मी माध्यमांना विनंती करते की, त्यांनी आमच्या मुलाच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आक्रमक वृत्तांकन टाळावं. एलन मस्क यांना आणखी एक मूल झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

‘छावा’च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; दमदार ओपनिंग, 2025 मधल्या सर्व चित्रपटांना मागे टाकले

एलोन मस्क यांना 2 पत्नींपासून 9 मुले आहेत. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, नेवादा, विवियन, ग्रिफिन, काई, सॅक्सन, डेमियन, एक्स Æ ए-12, एक्सा, टेक्नो स्ट्राइडर, एज्योर आणि एका लहान मुलाचे वडील आहेत. मस्क यांना 3 पत्नींपासून 12 मुले आहेत. त्यांच्या आयुष्यात 4 जीवनसाथी होते. त्यांच्या पहिल्या पत्नी जस्टिन विल्सनपासून त्यांना नेवादा, विवियन, ग्रिफिन, काई, सॅक्सन, डॅमियन अशी 6 मुले झाली. त्याची दुसरी पत्नी तलुलाह रिले हिच्यापासून त्यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांची तिसरी पत्नी ग्रिम्स हिच्यापासून त्याला तीन मुले झाली. त्यांच्या चौथ्या जोडीदारापासून त्यांना तिन मुलं झाल्याची माहिती मिळतेय. अलीकडेच त्यांना शिवोनपासून आणखी एक मूल झाल्याची माहिती मिळतेय. परंतु त्या बाळाचं नाव आणि लिंग अद्याप समोर आलेलं नाहीये.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube