17 बॅट, 27 बॅग आणि अडीच क्विंटल सामान…’त्या’ स्टार क्रिकेटरसाठी BCCI ने मोजले लाखो रुपये

Indian Cricketer Carried 27 Bags 17 Bats And 250 Kg Luggage : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी चांगली नव्हती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही हातातून निसटली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटमध्ये (Cricket) अनेक बदल झाले. दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावणे सोपे नव्हते. याचे अनेक परिणाम झाले. स्टार खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात (Indian Cricket) आले. ड्रेसिंग रूममधील चर्चा लीक झाल्या. त्याचे परिणाम खेळाडूंना भोगावे लागले. गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ दिवसेंदिवस वाईट होत गेला. रविचंद्रन अश्विन निवृत्त झालाय.
खेळाडूंमध्ये शिस्त आणण्यासाठी बीसीसीआयने (Bcci Rules) 10 नियम बनवले. खेळाडूंना हे नियम पाळावे लॉगतीलच, असं अनिवार्य करण्यात आलं. यापैकी दोन नियम आवश्यक आहेत. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास आणि कुटुंबासह प्रवास करण्यास बंदी आहे. आणखी एका नियमात सामानाची मर्यादा आहे. नवीन नियमानुसार, खेळाडू 150 किलोपेक्षा जास्त सामान नेऊ शकत नाहीत. एका ‘स्टार खेळाडू’ने ऑस्ट्रेलियाला 250 किलो सामान नेल्यामुळे हा नियम बनवण्यात आलाय.
Video : 99 हजारात अनलिमिटेड, 151 पाणीपुरी खाल्यास खास बक्षीस; नागपूरच्या विक्रेत्याची जगभरात चर्चा
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, हा खेळाडू ऑस्ट्रेलियाला 27 बॅगा घेऊन गेला. हा खेळाडू कोण आहे, हे माहित नाही. पण 27 बॅगा फक्त त्याच्या नव्हत्या. काही बॅगा त्याच्या कुटुंबाच्या आणि वैयक्तिक सहाय्यकांच्या होत्या. त्याच्या सामानात 17 बॅट्स होत्या, त्यांचंएकूण वजन अडीच क्विंटल होते. ऑस्ट्रेलियामध्ये हा खेळाडू एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होता. त्यामुळे बीसीसीआयला खर्च करावा लागला. नेमका आकडा जाहीर करण्यात आला नसला तरी तो लाखोंमध्ये आहे.
यासंदर्भात एक अहवाल समोर आलाय, त्यात म्हटलंय की, इतर खेळाडूंनीही असंच करायला सुरुवात केली. यानंतर बीसीसीआयने नियम अधिक कडक केलेत. आता कोणताही खेळाडू परदेशात 150 किलोपेक्षा जास्त सामान घेऊन जाऊ शकत नाही. जर खेळाडूच्या जास्त वस्तू असतील, तर त्याला स्वतःला त्या वस्तूंचा खर्च करावा लागेल. हे नियम चॅम्पियन्स ट्रॉफीपासून लागू होतील. खेळाडूंना सांगण्यात आलंय की, त्यांचं कुटुंब दुबईला जाऊ शकणार नाही. नियमांनुसार 45 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीच्या दौऱ्यावर, कुटुंब दोन आठवडे एकत्र राहू शकते. याचा अर्थ असा की, अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह सारख्या पत्नी त्याच्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर येऊ शकतात. या दोघी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्या अनेकदा सामने पाहण्यासाठी येतात.
हा नियम बीसीसीआयने खेळाडूंसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. यामुळे खेळाडूंमध्ये शिस्त येईल. याशिवाय, बीसीसीआयचा खर्चही कमी होईल, असं बोललं जातंय. पण भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत हे निश्चित. हा बदल टीम इंडियाच्या भविष्यासाठी चांगला असल्याचं देखील म्हटलं जातंय. एका व्यावसायिक खेळाडूने नेहमीच शिस्तबद्ध राहिले पाहिजे. हा नवीन नियम भारतीय क्रिकेटसाठी एक चांगले पाऊल आहे. यामुळे खेळाडूंमध्ये शिस्त येईल, संघाची कामगिरीही सुधारेल. भविष्यातही बीसीसीआय असेच कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.