Download App

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हादरा! पश्चिम जपानला 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप; मोठ्या त्सुनामीचा इशारा

  • Written By: Last Updated:

टोकिओ : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला मोठा भूकंपाचा (Earthquake) धक्का बसला असून, पश्चिम जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या तीव्र धक्क्यानंतर जपानमध्ये मोठी त्सुनामी येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर आतापर्यंत कोणतेही वित्त किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. (7.4 Magnitude Earthquake Hits In Western Japan, Tsunami warnings Sounded)

आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तांनुसार  जपान मेटोलॉजिकल एजन्सी (JMA) च्या मते, इशिकावा आणि जवळपासच्या प्रांतांना भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहे. त्यातील एका भूंकपाची प्राथमिक तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4  इतकी नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या तीव्र भूंकपाच्या धक्क्यांनतर मोठ्या त्सुनामीचा (Tsunami) इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळांवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किनारी भाग सोडण्याचे आदेी

7.4 रिश्टर स्केल एवढ्या तीव्र भूकंपाच्या धक्क्यांनंतर जपानमधील प्रशासनाने त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याबरोबर नागरिकांना त्वरीत किनारी भाग सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतातील किनारी भागातील नागरिकांनी शक्य तितक्या लवकर सुरक्षित स्थळ गाठावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून,  इशिकावा येथील नोटो द्वीपसमूहाजवळ समुद्रापासून 5 मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याची शक्यतादेखील प्रशासनातर्फे वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी 28 डिसेंबरला जपानमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. जपानच्या कुरिल बेटांवर झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी होती.

जपानमधील जोरदार भूकंपानंतर होकुरिकू इलेक्ट्रॉनिक पॉवर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर 36,000 हून अधिक घरांची वीज गेल्याचे म्हटले आहे. तसेच भूकंपाचा पॉवर प्लांटवर काय परिणाम झाला आहे याचादेखील तपास केला जात असल्याचे होकुरिकू इलेक्ट्रॉनिक पॉवर कंपनीने म्हटले आहे.

follow us