ॲपलचे सीईओ टिम कुक असोत किंवा ट्रम्प, नावामध्ये ‘डोनाल्ड’ का आहे, ‘डोनाल्ड’ नावाचा प्रवास

अमेरिकन नावांमध्ये मधलं नाव ठेवणायची परंपरा आहे, आणि डोनाल्डसारख्या नावांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लाभलेलं आहे.

Untitled Design 16

Untitled Design 16

A journey called ‘Donald’ : टीम कुक यांनी अँपलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा जाहीर करून तंत्रज्ञान विश्वात मोठी खळबळ उडवली आहे. कंपनीला लिहिलेल्या आपल्या भावनिक पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, हा निरोप नाही, तर माझ्या प्रवासातील पुढचा टप्पा आहे. त्यांच्या या वक्तव्यातून कंपनीशी असलेली बांधिलकी आणि पुढील भूमिकेबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. हा बदल येत्या 1 सप्टेंबरपासून अधिकृतपणे लागू होणार असून, तोपर्यंत ऑगस्ट अखेरपर्यंत ते CEO म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

टीम कुक हे नाव जगभर परिचित असलं तरी त्यांचं पूर्ण नाव टिमोथी डोनाल्ड कुक आहे. डोनाल्ड हा शब्द त्यांच्या नावात का आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. अमेरिकन नावांमध्ये मधलं नाव ठेवणायची परंपरा आहे, आणि डोनाल्डसारख्या नावांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लाभलेलं आहे. याच धर्तीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच पूर्ण नाव डोनाल्ड जॉन ट्रम्प असं आहे.

डोनाल्ड या नावाची उत्पत्ती स्कॉटिश भाषेतून झाली आहे. या नावाचा मूळ अर्थ जगाचा नेता किंवा विश्वाचा शासक असा घेतला जातो. स्कॉटलंडच्या प्रारंभीच्या इतिहासात या नावाला विशेष स्थान होतं. 9 व्या शतकातील प्रभावशाली राजा डोनाल्ड आय ऑफ स्कॉटलंड यांनी स्कॉटिश राज्यघटनेच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कारकिर्दीमुळे डोनाल्ड या नावाला सत्तेचं, नेतृत्वाचं आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं.

मध्ययुगीन काळात स्कॉटिश राजघराण्यांमध्ये हे नाव प्रतिष्ठेचं मानलं जायचं. पुढे ब्रिटिश आणि इमारिकां संस्कृतीत देखील या नावाने आपली छाप निर्माण केली. आज देखील डोनाल्ड ही नाव केवळ एक ओळख नसून, नेतृत्व, प्रभाव आणि ताकदीचं प्रतीक मानलं जातं. आधुनिक काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक प्रसिद्धीमुळे या नावाला आणखी व्यापक ओळख मिळाली.

दरम्यान टीम कुक यांचा अँपलमधील प्रवास देखील तितकाच प्रेरणादायी आहे. ते 1998 साली कंपनीत रुजू झाले, तेव्हा अँपल आर्थिक अडचणीतून सावरत होती. त्या काळात स्टीव्ह जॉब्स यांनी कंपनीला नवसंजीवनी दिली आणि ती, कुक यांनी ऑपरेशन्स क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे अँपलची पुरवठा साखळी अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनली.

2011 मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर टीम कुक यांनी सीईओ पदाची सूत्रे हाती घेतली. अनेकांनी त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका व्यक्त केली होती, मात्र त्यांनी आपल्या शांत, स्थिर आणि दूरदर्शी नेतृत्वाने अँपलला अभूतपूर्व उंचीवर नेले. त्यांच्या कार्यकाळात कंपनीने केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या देखील मोठी झेल घेतली.

टीम कुक यांच्या नेतृत्वाखाली अँपलने अनेक महत्वाची उत्पादने आणि सेवा सादर केल्या. यात अँपल वॉच, एअरपॉड्स, व्हिजन प्रो, एअर टॅग आणि अँपल म्युजिक यांसारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे. याशिवाय सेवाक्षेत्रात अँपलने मोठी वाढ साधली आणि कंपनीच्या उत्पन्नाचा महत्वाचा भाग या सेवांमधून येऊ लागला. तंत्रज्ञानाबरोबरच टीम कुक यांनी गोपनीयता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मुद्द्यांवर देखील ठाम भूमिका घेतली. त्यांनी अँपलला कार्बन न्यूट्रल बनवण्याच्या दिशेने पावले उचलली आणि वापरकर्त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले.

सीईओ पद सोडल्यानंतर टीम कुक एक्झिक्युटिव्ह चेअरमन या नव्या भूमिकेत काम पाहणार आहेत. या भूमिकेत ते जागतिक धोरणनिर्माते, सरकारे आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी संवाद साधतील. तसेच अँपलच्या दीर्घकालीन धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. टीम कुक यांचा हा निर्णय केवळ पदबद्दल नसून अँपलच्या पुढील पर्वाची सुरूवात मानली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेला बदल आणि त्यांनी निर्माण केली परंपरा पुढील नेतृत्वासाठी एक मजबूत पाया ठरणार आहे. त्यामुळेच त्यांनी म्हटल्याप्रमाणे, हा निरोप नाही, तर ही एक नवी सुरूवात आहे.

Exit mobile version