Download App

भारताची कारवाई अन् पाकिस्तानी शेअर बाजारात हाहाकार; गुंतवणूकदारांना मोठा फटका

Pakistani Stock Market : जम्मु आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27  पर्यटकांचा मृत्यू

  • Written By: Last Updated:

Pakistani Stock Market : जम्मु आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27  पर्यटकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने (Central Government) देखील कारवाईला सुरुवात केली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि या कारवाईचा पाकिस्तानच्या (Pakistan) अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे.

बुधवार 23 एप्रिलच्या रात्री भारत सराकारने पाच मोठे निर्णय घेतल्याने आज सकाळी पाकिस्तानी शेअर बाजारात गुंतवणूकदारांना (Pakistani Stock Market) मोठा फटका बसला आहे. आज सकाळी पाकिस्तानी बाजार उघडताच कोसळला. गुरूवारी सकाळी पाकिस्तानचा केएसई-100 निर्देशांक 2.12 टक्क्यांनी (2485.85 अंक) घसरून 1,14,740.29 अंकांवर आला. ज्यामुळे याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची प्रॉक्सी शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने स्वीकारली आहे. यानंतर भारताकडून कडक कारवाई होणार या भीतीने पाकिस्तानी शेअर बाजारातून अनेक गुंणतवूकदारांनी काढता पाय घेतला आहे.

तर दुसरीकडे बुधवारी रात्री पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारने परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय जाहीर केले, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क अंतर्गत व्हिसा सूट रद्द करणे यांचा समावेश आहे.

संविधानिक पदाचा वापर राजकीय ताबेदारीसाठी…, रोहित पवारांचा राम शिंदेंना सणसणीत टोला

तर सलग पाच दिवसांच्या तेजीनंतर आज भारतीय शेअर बाजारत किंचित घसरण दिसून आली आहे. गुरूवारी भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स 0. 39% टक्क्यांनी घसरुन 79801.43 अंकावर बंद झाला. तर एनएसई निफ्टी50  0. 34 टक्क्यांनी घसरुन 24246. 70 अंकावर बंद झाला. तर आज सकाळी सेन्सेक्स 58.06 अंकांच्या घसरणीसह 80,058.43 अंकांवर उघडला आणि निफ्टी 50 51.05 अंकांच्या घसरणीसह 24,277.90 अंकांवर उघडला होता.

follow us