Russia Ukraine War : रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्ध (Russia Ukraine War) वर्ष लोटलं तरीही संपलेलं नाही. या युद्धाचा दोन्ही देशांसह जगालाही मोठी फटका बसला आहे. या युद्धात रशियाचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. तरीही रशियाचे सैन्य अजूनही युक्रेनवर हल्ले करतच आहे. दुसरीकडे युक्रेन आर्मी सुद्धा या हल्ल्यांचा तिखट प्रतिकार करत आहे. यामागे खरे कारण म्हणजे युक्रेनला जगभरातून मदत मिळत आहे. त्यामुळे दीड वर्ष होत आले तरी रशिया युक्रेनचा पाडाव करू शकलेला नाही.
अमेरिका युक्रेनचा सर्वात मोठा साथीदार म्हणून पुढे आला आहे. अमेरिकेने (America) युक्रेनला नुकतीच मोठी मदत करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत अमेरिका युक्रेनला आणखी 4 हजार कोटी रुपयांची मदत करणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे युद्ध आणखी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
US announces additional USD 500 million security assistance package for Ukraine
Read @ANI Story | https://t.co/5K8SPZvcZO#US #Ukraine #RussiaUkraineWar pic.twitter.com/wMNFZ9v4zO
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2023
अमेरिकेच्या या निर्णयाचा रशियाला मोठा फटका बसणार आहे. काही दिवसांतच युक्रेनवर कब्जा करू असे दावे करणाऱ्या रशियाला हा आणखी एख झटका ठरणार आहे. अमेरिकेमुळेच रशियाचा विजय लांबला आहे हे आता सिद्ध झाले आहे. आता अमेरिकेने पुन्हा ही मदत जाहीर केल्याने रशियाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात जसे युद्ध सुरू झाले तेव्हापासूनच अमेरिका युक्रेनला मदत करत आला आहे. आर्थिक मदतीसह अमेरिका युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि अन्य सैनिकी उपकरणांचीही मदत करत आहे. अमेरिका प्रत्यक्षात युद्धात नसला तरी अशा पद्धतीने युक्रेनला मदत करून रशियाची कोंडी करत आहे. अमेरिका युक्रेनला मदत करत असल्याचा आरोप रशियाचे नेते सातत्याने करत आले आहेत. अमेरिकेमुळेच युद्धाचा निकाल लागत नसल्याचा आरोप केला जात आहे. आता हे आरोप अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या मदतीवरून खरे होत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयावर रशियाने अद्याप काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियन नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; नेमकं हे घडलं तरी कसं?