ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; नेमकं हे घडलं तरी कसं?

ऐकावं ते नवलंच! रातोरात दक्षिण कोरियातील लोकांचं वय घटलं; नेमकं हे घडलं तरी कसं?

Age measurement system in South Korea : आपण तरुण असावं, आपलं वय वाढूच नये, असं जगातल्या प्रत्येकाला व्यक्तीला वाटत असतं. पण, ते कदापी शक्य नाही. मात्र, तुम्हाला सांगितलं तर नवलं वाटेल की, दक्षिण कोरियातील (South Korea) 51 दशलक्ष लोकांचे वय हे एक-दोन वर्षांनी कमी झालं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण, हेच खरं आहे. वास्तविक, दक्षिण कोरियातील लोकांचे वय (Age of people in South Korea) एकाएकी एका रात्रीत कमी होण्यामागचे कारण म्हणजे दक्षिण कोरियाने वयाच्या गणनेबाबत जारी करण्यात आलेला नवा नियम. (Overnight, people in South Korea age decreased)

देशाने वय मोजण्याची आपली पारंपरिक पद्धत बदलली आहे. दक्षिण कोरियाने जगभर वापरल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय पद्धतीचा स्वीकार केला आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या नवीन संशोधनानुसार, करार आणि इतर अधिकृत दस्तऐवजांसह बहुतेक प्रशासकीय आणि नागरी बाबींमध्ये वयाची गणना जगाप्रमाणेच केली जाईल.

देशाने पारंपरिक पद्धतीचा त्याग केला

दक्षिण कोरिया 1960 पासून वैद्यकीय आणि कायदेशीर हेतूंसाठी जन्माच्या वेळी शून्यपासून वय मोजण्याचा आणि आणि प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष जोडण्याचा आंतरराष्ट्रीय नियम वापरत आहे. असे असूनही, बरेच लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात पारंपारिक पद्धतीचा वापर करत राहिले. डिसेंबरमध्ये, देशाने पारंपारिक पद्धत सोडून पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मानक स्वीकारण्याचा कायदा केला.

भाजपच्या पडद्यामागील चाणाक्याला काँग्रेसचा दणका; राहुल गांधींवरील व्हिडीओ अमित मालवीयांना महागात 

जुना कायदा काय होता?

दक्षिण कोरियात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेली एकही वयमापण पद्धती अस्तित्वात नव्हती. त्यामुळं भारतात जसं जन्मदिवसापासून पुढे दिवस आणि वर्ष असा पद्धतीनं माणसाचं वय मोजलं जातं, तसं दक्षिण कोरियात नाही. तर कोरियातील पूर्वीच्या वय मोजण्याच्या पद्धतीनुसार, दक्षिण कोरियामध्ये जन्माला आल्यावर मूल एक वर्षाचे मानलं जातं. मग ते एका दिवसाचं जरी बाळ असलं तरी ते एका वर्षाचं मानलं जातं. एवढेच नाही तर कॅलेंडरमधलं वर्ष बदललं की, ती व्यक्ती एका वर्षाने मोठी होते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखादं बाळ डिसेंबर महिन्यात जन्माला आलं तर त्याचं जन्मत: वय हे एक वर्ष असतं, आणि वर्ष बदललं की, १ जानेवारीपासून ते बाळ दोन वर्षाचं होतं.

दक्षिण कोरियाचे प्रशानस आतंरराष्ट्रीय स्तरावरील वयमापन पद्धती देशात लागू करण्यासाठी प्रयत्नशील होतं. डिसेंबरमध्ये दक्षिण कोरियाच्या संसदेने नियमांमधील दुरुस्तीला मंजुरी दिली होती. संसदेने सांगितले की, वयाची गणना करण्यासाठी स्वीकारलेल्या आंतरराष्ट्रीय पद्धतीमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल.

या समस्या दूर होतील

सरकारचे कायदे मंत्री ली वान-क्यु यांनी सोमवारी सांगितले की अध्यक्ष यून सुक-येओल यांनी वयाच्या मानकांमध्ये सुधारणा केली जाईल असे वचन दिले होते. आता वय मापणाची पद्धत बदलली आहे. ते म्हणाले की, आता वयाची मोजणी करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होणारे कायदेशीर वाद, तक्रारी आणि सामाजिक गोंधळ बऱ्याच अंशी कमी होतील, अशी आशा आहे

हे सर्वेक्षण गेल्या वर्षी करण्यात आले
गेल्या वर्षी एका सरकारी सर्वेक्षणात असे दिसून आले होते की, 86 टक्के दक्षिण कोरियाने नवीन कायद्याचे समर्थन केले होते. ते म्हणाले की नियम लागू झाल्यानंतर ते त्यांच्या दैनंदिन जीवनात आंतरराष्ट्रीय प्रणाली वापरतील.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube