Download App

अमेरिकेने हाणून पाडला गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट, भारताला दिला इशाारा

  • Written By: Last Updated:

Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पण अमेरिकेने त्याला वाचवल्याचे एका अहवालातून समोर आलं. फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या (America) भूमीवर एका या शीख खलिस्तानी दहशतवाद्याला ठार मारण्याचा कट हाणून पाडला आहे. या कटात भारताचाही आरोप असल्यचाा आरोप करण्यात आला असून भारतालाही इशारा देण्यात आला.

‘आमच्यात येऊ नका मग म्हणतोयं कुठं जातो रं’; भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून जरांगेंनी सुनावलं 

फायनान्शिअल टाईम्समधील वृत्तानुसार, अमेरिकन अधिकार्‍यांनी एका शीख फुटीरतावाद्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. भारताकडून हा कट रचला जात असून यातून पन्नूला लक्ष्य केलं जात आहे. मात्र, या वृत्तावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, यूएस फेडरल वकिलांनी पन्नू प्रकरणातील एका गुन्हेगाराविरुद्ध न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात कट रचल्याबाबत आरोपपत्र दाखल केले आहे. सध्‍या, यूएसचे जस्टीस डिपार्टमेंट हे आरोपपत्र उघडायचे आणि सार्वजनिक करायेच की नाही, याचा विचार करत आहे. यासोबतच निज्जर खून प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याचाही विचार सुरू आहे. या प्रकरणाची माहिती असलेले लोक म्हणाले, ‘ज्या व्यक्तीवर आरोप आहे, तो अमेरिकेतून निघून गेला आहे.

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात चकमक, २ जवान शहीद, लष्कराची शोध मोहिम तीव्र 

वृत्तानुसार, अमेरिकेचे जस्टीस डिपार्टेंमेंट आणि एफबीआयने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलने म्हटले आहे की, अमेरिका चालू असलेल्या कायदेशीर आपल्या मित्र राष्ट्रांशी खाजगी राजनैतिक चर्चेवर भाष्य करत नाही. मात्र, अमेरिकन नागरिकांची सुरक्षा राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यात म्हटले आहे.

पन्नू हा अमेरिकन आणि कॅनडाचे नागरिक असून तो शीख फॉर जस्टिसचा जनरल काउंसिल आहेत. वेगळ्या खलिस्तानची मागणी करणारा हा अमेरिका गट आहे.

माझा बायडेन प्रशासनावर विश्वास

फायनान्शिअल टाईम्सने याप्रकरणी पन्नू याच्याशी चर्चा केली. अमेरिकन प्रशासनाने त्याला या कटाची माहिती दिली होती की नाही हे पन्नूने सांगितले नाही, परंतु तो म्हणाली – मला अमेरिकन भूमीवर मारण्याच्या कटाचे उत्तर अमेरिकन सरकारने द्यावे असे मला वाटते. अमेरिकन भूमीवर कोणत्याही अमेरिकन नागरिकाला धोका हे अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला आव्हान आहे आणि मला विश्वास आहे की बायडेन प्रशासन अशा कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये हत्या करण्यात आली होती. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यामध्ये भारतीय गुप्तचर संस्थांचा हात असल्याचा आरोप केला होता. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. दरम्यान, निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडात तणाव निर्माण झाला आहे. भारताने ट्रुडोचे आरोप मूर्खपणाचे म्हणून फेटाळले होते.

Tags

follow us