19 तारखेला एअर इंडियाचे विमान उडवून देणार, शिखांनी प्रवास करू नये; गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

  • Written By: Published:
19 तारखेला एअर इंडियाचे विमान उडवून देणार, शिखांनी प्रवास करू नये;  गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

Gurpatwant Singh Pannu threat to India : ‘शिख फॉर जस्टिस’ या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. शीख समुदायातील कोणत्याही व्यक्तीने 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या (Air India) विमानाने प्रवास करू नये, असा इशारा पन्नू याने दिला आहे. त्याने या धमकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. या धमकीमुळं एकच खळबळ उडाली आहे.

19 तारखेला एअर इंडियाचे विमान उडवून देणार, शिखांनी प्रवास करू नये; गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी 

भारताला इशारा देताना खलिस्तानी गुरपतवंत सिंग याने सांगितलं की, 19 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाचे विमान उडवून देऊ. त्यामुळं 19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास शिखांनी प्रवास करू नये. अन्य़था तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं पन्नने म्हटलं. याशिवाय, पन्नने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दिवशी बंद करण्याची धमकी दिली आहे. 19 नोव्हेंबर हाच दिवस ‘वर्ल्ड टेरर कप’च्या फायनलचा आहे. त्याने ‘क्रिकेट वर्ल्ड कप’ला ‘वर्ल्ड टेरर कप’ म्हणत ही धमकी दिली आहे.

या विमानतळाला शहीद बेअंत सिंग, शहीद सतवंत सिंग खलिस्तान विमानतळ असे नाव देण्यात येईल, असा धमकीवजा इशाराही गुरपतवंत पन्नू याने दिला. स्वातंत्र्याचा हा लढा कोणीही रोखू शकत नाही. भारत सरकारच्या रणगाडे आणि तोफांनी हा स्वातंत्र्यलढा थांबवता येणार नाही, असंही तो म्हणाला.

दरम्यान, बेअंत सिंह आणि सतवंत सिंह हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक होते. या दोघांनी 31 ऑक्टोबर रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार केला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, याआधीही गुरपतवंत सिंग पन्नू याने हल्ल्याचा इशारा दिला होता. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर पन्नूने एक व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये त्याने हमासप्रमाणे भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आयसीसी विश्वचषक २०२३ अंतर्गत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्याने ही धमकी दिली होती. याविरोधात पोलिसांनी एफआयआरही नोंदवला होता. अहमदाबाद सायबर पोलीस ठाण्यात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पन्नूने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि फोन कॉलद्वारे या धमक्या दिल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube