World Cup 2023 : चारशे धावा करूनही न्यूझीलंड पराभूत, पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये

  • Written By: Published:
World Cup 2023 : चारशे धावा करूनही न्यूझीलंड पराभूत, पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमध्ये

PAK vs NZ : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) आजच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान (Pakistan) गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्यामुळे न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानसमोर 401 धावांचे मोठे टार्गेट ठेवले होते. त्यानंतर पाक (Pakistan) फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर देत दोनशे धावांपर्यंत मजल मारली. परंतु मॅचच्या दरम्यान पावसाचा खेळ झाला. त्यामुळे पंचांनी खेळ थांबविला. त्यानंतर डकवर्थ लुईस (DLS) नियमानुसार पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित केले. त्याचबरोबर सेमीफायनलचे गणितही बदलले आहे. पाकिस्तान संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये आला आहे.

या विजयाबरोबर पाकिस्तान पाँइट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आला आहे. पाकच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. आफ्रिका आता सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. बेंगळुरू येथील मॅच पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघासाठी महत्त्वाची होती. न्यूझीलंड पराभूत झाल्याने या संघासाठी आता सेमीफायनलमध्ये दाखल होण्याचे आव्हान कठिण झाले आहे. न्यूझीलंड आठ मॅच खेळली असून, त्यात चार जिंकल्या आहेत. त्यामुळे हा संघ आठ पाँइटसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान आठ मॅचपैकी चार मॅच जिंकून पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मॅचनंतर पाँइट टेबलमध्ये आणखी बदल होईल.

पाँइट टेबलमध्ये भारत टॉपवर आहे. तर आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान संघही सेमीफायनलच्या रेसमध्ये आहे. पाकिस्तानच्या विजयाचा फायदा आफ्रिकेला झाला आहे. तर सेमीफायनलची लढाई रंगतदार झाली आहे. भारत व आफ्रिका हे दोन संघ सेमीफायनलमध्ये धडकले आहेत. आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान व अफगाणिस्तान या चार संघामध्ये सेमीफायनलसाठी चुरस आहे.

रचिन रविंद्र, केन विलियमसनचे धुव्वाधार खेळी

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढत सहा विकेटच्या मोबदल्यात 401 धावा केल्या. त्यात रचिन रवींद्रने 108 धावांची तुफानी खेळी केली. तर विलियमसनने 95 धावा काढल्या. पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकने 1 विकेटच्या बदल्यात दोनशे धावा केल्या. फखर जमानने नाबाद 126 धावांची स्फोट खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमनेही नाबाद 66 धावा केल्या आहेत. त्यानंतर पाऊस आला आणि पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube