Download App

अमेरिकन खासदार 15 ऑगस्टला पाहुणे: आजोबा होते स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींसोबत तुरुंगातही गेले

US Congressman Ro Khanna : देशभरात 77 व्या स्वातंत्र्यदिनाची जोरदार तयारी सुरु आहे. यावेळी दिल्लीतील स्वातंत्र्याच्या सोहळ्याला अमेरिकन काँग्रेस खासदार रो खन्ना आणि मायकेल वॉल्ट्ज उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही खासदार अमेरिकेतील इंडिया कॉकसचे सदस्यही आहेत. ही इंडिया कॉकस अमेरिकेचे भारताबाबतची रणनीती आणि विचार ठरवण्यात मदत करते.

पंतप्रधानांचे भाषण ऐकणार, राजघाटावरही जाणार
लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण अमेरिकेचे दोन्ही खासदार ऐकणार आहेत. यानंतर राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीलाही भेट देणार आहे. यानंतर मुंबई, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथे व्यवसाय, तंत्रज्ञान, सरकार आणि बॉलीवूडमधील लोकांशी बैठका होणार आहेत.

यूएस काँग्रेसचे खासदार रो खन्ना म्हणाले की, भारतातील शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना मला अभिमान वाटतो. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि संरक्षण संबंध कसे मजबूत करता येतील यावरही आम्ही भारतासोबत चर्चा करू. दोन्ही देश सर्वात जुने आणि सर्वात मोठे लोकशाही असलेले देश आहेत.

Sai Ranade: “रॅगिंग अन् प्रचंड त्रास …”, मराठी अभिनेत्रीने लोकप्रिय मालिकेबद्दल केला धक्कादायक खुलासा!

कोण आहेत रो खन्ना
रो खन्ना हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे आजोबा अमरनाथ विद्यालंकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनानी होते. महात्मा गांधींसोबत त्यांनी चार वर्षे तुरुंगात काढली. ते भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य होते. विद्यालंकर तिसऱ्या आणि पाचव्या लोकसभेचे सदस्यही होते. याशिवाय 1957 ते 1962 पर्यंत ते पंजाब सरकारमध्ये शिक्षण, कामगार आणि भाषा मंत्रीही होते.

GST पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल; उत्तर प्रदेश, गुजरात आसपासही नाहीत!

भगतसिंग-चंद्रशेखर यांची भेट घडवली
अमरनाथ विद्यालंकर शिक्षण पूर्ण करून असहकार चळवळीत सामील झाले होते. यानंतर डिसेंबर 1126 पासून लाला लजपत राय यांच्या मृत्यूपर्यंत ते त्यांचे स्वीय सचिव होते. लाला लजपत राय यांनी विद्यालंकार यांना लाहोर नॅशनल कॉलेजमध्ये इतिहास शिकवण्याची नोकरी दिली. येथे भगतसिंग आणि त्यांचे सहकारी विद्यालंकर यांचे विद्यार्थी होते. विद्यालंकारांनीच भगतसिंग यांना रामप्रसाद बिस्मिल यांना भेटण्यासाठी कानपूरला पाठवले, जिथे ते काकोरी घटनेनंतर चंद्रशेखर आझाद यांचे सहकारी बनले.

Tags

follow us

वेब स्टोरीज