GST पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल; उत्तर प्रदेश, गुजरात आसपासही नाहीत!

GST पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल; उत्तर प्रदेश, गुजरात आसपासही नाहीत!

जीएसटी पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दाखल केलेल्या प्राप्तिकर डेटानुसार, महाराष्ट्रातून यावर्षी सर्वाधिक 1.98 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर भरला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेश, गुजरातमधील अंतर बरेच मोठे आहे. (The tax return data filed in financial year 2022-23 showed that Maharashtra yet again topped)

अर्थमंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून यावर्षी सर्वाधिक 1.98 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर भरला आहे. उत्तर प्रदेशमधील 75.72 लाख नागरिकांनी तर गुजरातमधील 75.62 लाख नागरिकांनी प्राप्तिकर दाखल केले आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, दिल्ली आणि आंध्र प्रदेशनेही सर्वाधिक प्राप्तिकर दाखल करणाऱ्या पहिल्या दहा राज्यांमध्ये स्थान मिळवले आहे.

प्राप्तिकरच्या डेटानुसार, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी प्राप्तिकर दाखल केलेल्या नागरिकांची संख्येतही वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 7.39 कोटी तर गतवर्षी 7.14 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर दाखल केले होते. तर यंदा 7.78 कोटींहून अधिक अधिक नागरिकांनी प्राप्तिकर दाखल केले आहे. यापैकी 53.67 लाख नागरिकांनी प्रथमच प्राप्तिकर दाखल केले आहे.

कोट्याधीशांची संख्याही वाढली :

यावर्षी कोट्याधीशांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी एक कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्न नोंदवणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. 1 लाख 69 हजार 890 व्यक्तींनी 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न दाखवले आहे. मागील आर्थिक वर्षात 1 लाख 14 हजार 446 नागरिकांनी 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न दाखविले होते.

जीएसटीतही महाराष्ट्र अव्वल :

नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार जुलै 2023 मध्ये जीएसटी भरणाऱ्यांच्या आकडेवारीतही महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रातून 22 हजार 129 कोटी रुपयांचा जीएसटी गत महिन्यात केंद्राला जमा झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ 9 हजार 795 कोटी रुपयांचा कर्नाटकमधून तर 9 हजार 183 कोटी रुपयांचा जीएसटी केंद्राला जमा झाला आहे. त्यापाठोपाठ चौथ्या नंबरवर तामिळनाडूचे नाव येते. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा नंबर लागतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube