Mary Millben : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. नितीश कुमार यांनी माफी मागितल्यानंतरही प्रकरण शांत झालेले नाहीत. देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आज बिहार विधानसभेत (Bihar Politics) प्रचंड गदारोळ झाल्याने दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. इतकेच नाही तर आता या वादात अमेरिकी गायिका मैरी मिलबेन (Mary Millben) यांनी एन्ट्री घेत नितीश कुमार यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच त्यांनी नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या वक्तव्यावर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच माध्यमांसमोर येत नितीश कुमार यांनी माफी मागितली.
#WATCH | Washington, DC: On Bihar CM Nitish Kumar's statement, African-American actress and singer Mary Millben says, "The 2024 election season has commenced across the world, here in America, and certainly in India. Election seasons present an opportunity for change, to put an… pic.twitter.com/7ZFN6ta61O
— ANI (@ANI) November 8, 2023
मी भारताची नागरिक असते तर..
अमेरिकी गायिका आणि आफ्रिकी अमेरिकी अभिनेत्री मेरी मिलबेनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. भारताला बिहारमध्ये एका निर्णायक घडीचा सामना करावा लागत आहे. महिलांनाच आव्हान दिले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मला वाटते की या आव्हानाला एकच उत्तर आहे ते म्हणजे आता एका धाडसी महिलेने पुढे आले पाहिजे. या महिलेने बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढावी आणि नितीश कुमार यांना आव्हान द्यावे. जर मी भारताची नागरिक असते तर मी स्वतः बिहारमध्ये जाऊन निवडणूक लढले असते.
बिहारच्या नागरिकांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, तुम्ही बिहारचे नागरिक आहात. बदल करण्यासाठी तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. बिहारमध्ये नेतृत्व करण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्याचे काम भाजपाला करावे लागेल. मला बरेच लोक विचारतात की तुम्ही नरेंद्र मोदी यांचे समर्थन का करता. भारतातील घडामोडींवर इतके लक्ष का ठेवता, या प्रश्नांचे उत्तर सोपे आहे. माझे भारतावर प्रेम आहे. मला असं वाटतं की पीएम मोदी भारत आणि भारतीय नागरिकांच्या प्रगतीसाठी सर्वात चांगले नेते आहेत.
Israel Hamas War : युद्ध भडकले! पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला
नितीश कुमारांनी माफी मागितली
लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना महिलांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अखेर नरमेची भूमिका घ्यावी लागली. वादग्रस्त विधानावर नितीशकुमार यांनी जाहीर माफी मागितली असून, आपण केवळ महिलांच्या शिक्षणावर बोललल्याचे नितीश यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचेही ते म्हणाले. आपल्याकडून काही चुकीचे बोलले गेले असल्यास त्याबद्दल मी सर्वांची जाहीर माफी मागतो असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न काल केला होता.