महिलांवरील वादग्रस्त विधानावर नितीश कुमार नरमले; उघडपणे मागितली माफी

  • Written By: Published:
महिलांवरील वादग्रस्त विधानावर नितीश कुमार नरमले; उघडपणे मागितली माफी

पाटणा : लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना महिलांवर वादग्रस्त विधान केल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar )यांना अखेर नरमेची भूमिका घ्यावी लागली आहे. वादग्रस्त विधानावर नितीशकुमार ( Nitish Kumar) यांनी जाहीर माफी मागितली असून, आपण केवळ महिलांच्या शिक्षणावर बोललल्याचे नितीश यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचेही ते म्हणाले. आपल्याकडून काही चुकीचे बोलले गेले असल्यास त्याबद्दल मी सर्वांची जाहीर माफी मागतो असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ( Bihar CM NItish Kumar Apologise After Controversial Population Control Remarks)

नेमकं काय म्हणाले नितीश कुमार?

चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्री नितीश यांनी बिहार येथे महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारल्याचे यावेळी सांगितले. मुलींनी शिक्षण घेतल्यास लोकसंख्या नियंत्रणास मोठा हातभार लागणार आहे, असे त्यांनी सांगितलं. तसेच जेव्हा एखादी स्त्री शिक्षित असते, तिला याची जाणीव असते. यामुळे ती आपल्या नवऱ्याला सांगू शकणार की, शारीरिक संबंधाच्या शेवटी (इजॅक्युलेट). बाहेर करा,” बाकी तुम्ही जे काही समजून घायचे आहे, ते समजून घ्या. यामुळे लोकसंख्या कमी होत असल्याचं त्यांनी यावेळी म्हणाले आहे.

नितीश कुमार यांच्या वर्णन कथेवर अनेक आमदारांना हसू आलं तर अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. परंतु  यावरून भाजप त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड सोडली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत असल्याचे बघायला मिळत आहे. आपले भाषण पूर्ण करत असताना नितीश कुमार म्हणाले की, या गोष्टीमुळे लोकसंख्या कमी झाली आहे. आपल्या विधानाला त्यांनी काही आकडेवारीचा दाखला दिला आहे.

Karnataka : CM सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात? ‘त्या’ गुप्त बैठकीनंतर DK थेट दिल्लीला रवाना

मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधानसभेतही विचित्र बोलले होते. त्यानंतर हे विधानपरिषदेमध्ये त्यांनी विचित्र शब्द वापरले आहेत. लोकसंख्या नियंत्रणासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करत विचित्र टिप्पणी केली. यामुळे महिला आमदार खाजिल झाल्या. तर काही पुरुष आमदारही हसतही होते. परंतु आता विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. तसेच माफी मागण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे. नितीश कुमार यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube