मोठी बातमी : इराण-अमेरिका पुन्हा भिडले; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने नाक दाबले !

Hormuz Strait-इराणने बहरीन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील लक्ष्यांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.

Iran Isrel

Iran Isrel

IRAN-ISRAEL WAR -इराण-इस्रायल-अमेरिका (IRAN-ISRAEL) यांच्यातील शस्त्रसंधी उठल्यानंतर पुन्हा युद्धाला तोंड फुटले आहे. रविवारी पहाटे अमेरिकेने इराणवरील क्षेपणास्त्र, ड्रोन असणाऱ्या भागावर हवाई हल्ले केले आहेत. त्याला इराणने प्रत्युत्तर देत अमेरिकेला मदत करणाऱ्यांना शेजारीला राष्ट्रांना लक्ष्य केले आहेत. तर इराणने पुढील आदेश येईपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) बंद केली आहे. त्यामुळे पुन्हा येथील वाहतूक ठप्प होईल. त्यामुळे जगाला पुन्हा इंधनाचा तुटवडा जाणू शकतो. तसेच या मार्गावर पुन्हा हल्ले झाल्यास परिसरातील शत्रूच्या इतर लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.

रविवारी पहाटे अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणने बहरीन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील लक्ष्यांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने सांगितले की, इराणमधील सुमारे 140 ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. या लक्ष्यांमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रक्षेपण केंद्रे, दारूगोळ्याचे साठे, दळणवळण यंत्रणा आणि इतर लष्करी सुविधा यांचा समावेश होता. सेंटकॉमनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर आणि नाविकांवर हल्ला करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता.


वडिलांनी निवडणूकीत 2 कोटी रुपये लावले इमेजला धक्का लागला तर…, राऊतांच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप

सेंटकॉमने दावा केला की, सायप्रसचा ध्वज असलेल्या एका कंटेनर जहाजावर इराणने हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन रूमचे मोठे नुकसान झाले असून चालक दलातील एक सदस्य बेपत्ता आहे. यावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने प्रतिक्रिया देताना म्हटले की, काही जहाजांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून निश्चित केलेल्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने प्रवास केला होता.

अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, कतार आणि यूएईतील लक्ष्यांवर हल्ले केल्याचे सांगितले. तसेच, पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहील आणि त्यावर पुन्हा हल्ले झाल्यास परिसरातील शत्रूच्या इतर लष्करी तळांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा इराणने दिलाय.


इराणला आता किंमत मोजावी लागणार: अमेरिकेचा इशारा

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सोशल मीडियावरून इराणला कडक इशारा दिला आहे. इराणने चुकीचा मार्ग निवडला असून, आता त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा अमेरिकेने इशआरा दिला आहे. दरम्यान, कुवेतच्या लष्कराने देशावर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे सांगितले, तर कतारच्या लष्कराने इराणकडून करण्यात आलेला हल्ला हवेतच निष्फळ ठरवल्याचा दावा केला.


फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध अन्… विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप

इराणाच्या हल्ल्यांचा निषेध
लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी जॉर्डन, बहरीन, कुवेत, ओमान आणि कतारवरील इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. राष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ते म्हणाले, या देशांतील आमच्या बंधू राष्ट्रांशी आम्ही पूर्ण एकजूट व्यक्त करतो आणि त्यांना आमचा ठाम पाठिंबा कायम राहील. दक्षिण लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी कारवाईमुळे इराण आणि लेबनॉन सरकार यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. इराण हे हिझबुल्लाहला पाठिंबा देत असताना, लेबनॉन सरकार देशातील सर्व शस्त्रास्त्रांवर केवळ राज्याचे नियंत्रण असावे, यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इशारा दिला आहे की, “इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील आपला कब्जा कायम ठेवला, तर या प्रदेशात शांतता राहणार नाही.

Exit mobile version