Iran US War : ‘शस्त्रसंधी’ची घोषणा फायदेशीर ठरली…कच्चा तेलाच्या किमती घटल्या अन् शेअर बाजारात तेजी…

इराण अमेरिका युद्धविरामाच्या घोषणनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून आशिया शेअर बाजार तेजीत असल्याचं चित्र दिसून आलंय.

Untitle (35)

Iran US War : अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता इराणच्या नागरिकांसह अनेकांनी मोकळा श्वास घेतलायं. गेल्या 40 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर शमवलंय. पाकिस्तानने मध्यस्थी करत इराणचा प्रस्ताव अमेरिका दिला त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रस्ताव चर्चेसाठी योग्य असल्याचं म्हणत शस्त्रसंधी मान्य करीत युद्धाला विराम दिलायं. युद्धविरामाची घोषणा होताच जागतिक बाजारात तत्काळ परिणाम दिसून आले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीचे दर घसरले असून शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळालीयं.

सारा अली खानने डबिंग स्टुडिओमधील झलक शेअर केली; मुदस्सर अज़ीजसोबतच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

युद्धविरामामुळे आशियातील शेअर बाजार तेजीत असून जपानचा निक्केई निर्देशांक पाच टक्क्यांसह 2400 अंक वर गेला आहे. तर दक्षिण कोरियाच्या कोस्पी बाजारात पाच टक्क्यांनी वाढ झाली असून हॉंगकॉंग सिंगापूर अडीच टक्क्यांनी वधारलं असून आशियातील शेअर बाजारातील तेजीचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीयं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यांनी दोन आठवड्यांसाठी लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेने इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केल्याने शेअर बाजारांना दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीही प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरल्या. तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचं दिसून आलं आहे. डाऊ जोन्स फ्युचर्स 900 अंकांनी वधारले. अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आर्थिक आघाडीवर ही तेजी दिसून येत आहे. आज बाजार उघडल्यानंतर भारतासह आशियाई बाजारांमध्येही अशीच तेजी दिसण्याची शक्यता आहे.

शेत जमीन नाही, महिंद्रा थार खरेदीसाठी 20 लाखांचा कर्ज; करुणा धनंजय मुंडेंची संपत्ती किती ?

अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल जवळपास 20 डॉलरची घसरण झाली. मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठीच्या WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 18.10 डॉलरने, म्हणजेच 16.02 टक्क्यांनी घसरून 94.85 डॉलर झाली. यापूर्वी ही किंमत 26 मार्चनंतरच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 91.05 डॉलरवर पोहोचली होती. जगातील सुमारे 20% तेल वाहून नेणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुन्हा वाहतूक करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या मुदतीच्या अगदी आधी ही युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.

follow us