मोठी बातमी! इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न; IRGC दहशतवाद्याला अटक

Ivanka Trump :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमेरिकन तपास

Ivanka Trump

Ivanka Trump

Ivanka Trump :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमेरिकन तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात ट्रम्प यांचे कुटुंब हे इराणी दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याचे उघड झाले. इव्हांका यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप इराणी संस्था ‘IRGC’ वर ठेवण्यात आला आहे. इराण-समर्थित या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित एका व्यक्तीने इव्हांका यांची हत्या करण्याची योजना आखली होती.

अमेरिकन तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान त्याने खुलासा केला की, सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले इराणी लष्करी कमांडर कासेम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला त्याला घ्यायचा होता. तो इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) या संस्थेशी संलग्न आहे आणि या संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर तो अमेरिकेत दाखल झाला होता. त्याने इव्हांका ट्रम्प यांच्या हत्येची अत्यंत बारकाईने योजना आखली होती, परंतु अखेरीस त्याला आपला कट अंमलात आणण्यात अपयश आले.

संशयिताला इराण आणि IRGC चा पाठिंबा

अमेरिकन तपास यंत्रणांनी या संशयिताची ओळख ‘मोहम्मद बाकिर साद दाऊद अल-सादी’ अशी पटवली आहे. तो ३२ वर्षांचा असून मूळचा इराकी नागरिक आहे. तो सुलेमानी यांना आपला मार्गदर्शक मानत असे आणि सुलेमानी यांच्या मृत्यूच्या दिवसापासूनच तो ट्रम्प कुटुंबातील सदस्यांच्या हत्येचा कट रचत होता. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद बाकिर इतका मोठा कट एकट्याने रचू शकला नसता त्याला इराणी सरकार, इराणी लष्कर आणि IRGC यांचा पाठिंबा होता. त्यांच्याच मदतीने तो अमेरिकेत पोहोचण्यात यशस्वी झाला होता.

Exit mobile version