Download App

Dhirendra Krishna Maharaj : बागेश्वर धामच्या बाबांनाच धमकी, सरकारचे एसआयटी तपासाचे आदेश

छतरपूर : बागेश्वर धामचे (Bageshwardham) बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांचे नातेवाईक असलेले लोकेश गर्ग यांनी मध्यप्रदेशातील (MP) छतरपुरमध्ये धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. लोकेश धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे चूलत भाऊ आहेत. त्यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे की, ‘तुमच्या परिवारातील लोकांच्या तेराव्याची तयारी करा.’

त्यानंतर या परिवारातील धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांचे चूलत भाऊ लोकेश गर्ग यांनी मध्यप्रदेशातील छतरपुरमध्ये पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू झाला आहे. ज्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्याचं नाव अमर सिंह आहे. पोलिसांनी सांगितले की, या धमकी देणाऱ्याचा तपास सुरू असून त्याचा फोन नंबर ट्रेस केला आहे.

या अगोदर बागेश्वरधामचे (Bageshwardham) धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात आणि अंधश्रद्धा पसरवीत असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक प्रा. श्याम मानव (shyam manav) यांनी केला होता. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

धीरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती होती. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. वारंवार येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील बागेश्वरधामचे गदाधारी धीरेंद्र कृष्ण महाराज हे सर्वसामान्य हिंदूंची फसवणूक करतात. स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करतात आणि आस्थेला अंधश्रद्धेत बुडवित असल्याचा आरोप करत, आम्ही नव्हे तर हे महाराजच सनातन हिंदू धर्माचे नुकसान करीत असल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला होता.

Tags

follow us