Download App

बांग्लादेशातील हिंसाचारात कुणाचा हात? शेख हसीनांच्या मुलाचा खळबळजनक दावा

बांग्लादेशातील आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा सहभाग असल्याचा संशय आहे असे सजीब वाजेद यांनी सांगितले.

Bangladesh Crisis : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. बांग्लादेशात इतका हिंसाचार (Bangladesh Crisis) कसा उफाळून आला. यामागे कुणाचं षडयंत्र होतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर देशात हिंसक घटना सुरू झाल्या असेच आतापर्यंत सांगितले जात होते. परंतु, सजीब वाजेद यांनी एक खळबळजनक माहिती दिली आहे. बांग्लादेशातील आंदोलनात आंदोलनकर्त्यांना एका गुप्त संस्थेने चिथावणी दिली होती. या निदर्शनांमागे पाकिस्तानच्या (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असावा, अशी माहिती त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

बांग्लादेशातील अशांतता (Bangladesh Violence) देशांतर्गत मुद्द्यांपेक्षा बाहेरील शक्तींनी जास्त प्रेरित होती. माझ्या आईनं जे वक्तव्य केलं ते देखील चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. ज्यामुळे आंदोलनाला जास्तच हवा मिळाली. त्यामुळे मला आयएसआयवर (ISI) पूर्ण संशय आहे असा संशय सजीब वाजेद  यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर बांग्लादेशातील हिंसाचारात विदेशी शक्तींचा हात असल्याचे सिद्ध होत आहे.

Bangladesh Protests : मोठी बातमी! बांग्लादेशात स्थापन होणार अंतरिम सरकार, गुरुवारी शपथविधी

शेख हसीना सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसारच आरक्षण बहाल केलं होतं. त्यामुळे आंदोलनाचा काहीच प्रश्न नव्हता. तरी देखील आंदोलन झालं. या काळात शेख हसीना यांनी जी वक्तव्ये केली ती देखील चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली ज्यामुळे आंदोलनाने अधिकच जोर धरला. बांग्लादेश सरकारने कुणावरही हल्ला करण्याचा आदेश कधीच दिला नव्हता. दारूगोळा शस्त्रात्रांचा वापर करण्याचाही आदेश नव्हता. ज्या पोलिसांनी बळ प्रयोग केला होता त्या पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. माझ्या आईने फक्त विद्यार्थ्यांना प्राधान्य आणि देशातील हिंसाचार रोखण्यासाठीच देश सोडला असे सजीब वाजेद यांनी सांगितले.

ढाका ट्रिब्यूनने (Dhaka Tribune) दिलेल्या वृत्तानुसार शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर हिंसाचार जास्त उफाळला. शेख हसीना यांनी बांग्लादेश (Bangladesh News) सोडल्यानंतर झालेल्या हिंसाचारात कमीत कमी 232 लोकांचा मृत्यू झाला. मागील 23 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात जवळपास 560 लोक मारले गेल्याचेही सांगितलं जात आहे.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

follow us