बांगलादेशात जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं; सलमान खुर्शीद यांचा खळबळजनक दावा

बांगलादेशात जे घडतंय ते भारतातही होऊ शकतं; सलमान खुर्शीद यांचा खळबळजनक दावा

Salman Khurshid : आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशा (Bangladesh) राजकीय अस्थिरता निर्माण झाली. शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे सरकार कोसळले आहे. आंदोलकांनी सुरू केलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशातून पलायन केलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांनी बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला आहे.

… तर धाराशिव बाहेर जाऊ दिलं नसतं’, जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना थेट इशारा 

शिकवा ए हिंद या मुजीबुर रहमान यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सलमान खुर्शीद यांच्या हस्ते प्रकाशित झालं. त्यावेळी बोलतांना खुर्शीद म्हणाले की, काश्मीरमध्ये सारं काही सामान्य दिसत आहे. येथेही सर्वकाही आलबेल आहे, असं वाटू शकतं. आपण विजयाचा आनंद साजरा करत आहोत. मात्र बांगलादेशात जे काही घडत आहे ते भारतातही घडू शकते. तिथे काय परिस्थिती आहे ते आपण पाहत आहोतच. तशीच भारतातही उद्भवू शकते, असं वक्तव्य खुर्शीद यांनी केलं.

कॉग्रेसकडून भीती पसरवण्याचं काम
तर भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी खुर्शीद यांच्या वक्तव्यावरून कॉंग्रेसवर टीका केली. ते म म्हणाले की, काँग्रेसचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यामुळे देशात अराजक माजवण्याची काँग्रेसची मानसिकता आहे. भीती आणि भ्रम पसरवणे हा त्यांचा जुना खेळ आहे. देशाला मागे नेण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते. काँग्रेसचे नेते देशाचे नुकसान करत आहेत. देशात भीती पसरवण्याचं काम कॉग्रेसकडून केलं जात, हे कॉंग्रेसने थांबवले पाहिजे, असं ठाकूर यांनी सांगितले.

बांगलादेशात नेमकं काय घडलं
बांगलादेशात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण लागलं. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. या घटनेनंतर बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून तोडफोड केली. बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube