बांगलादेशात दंगलखोरांचा धुडगूस सुरूच! हिंदू गायक राहुल आनंदच्या घराला लावली आग

बांगलादेशात दंगलखोरांचा धुडगूस सुरूच! हिंदू गायक राहुल आनंदच्या घराला लावली आग

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये राजकीय गोंधळानंतर लष्कराने सत्ता काबीज केली आहे. (Bangladesh Violence) बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांनीही राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पळ काढला आहे. सध्या बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या हत्या आणि घरांना आग लावण्याच्या अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आता ढाका येथे हिंदू गायक राहुल आनंदच्या (Hindu Singer Rahul Anands) घराला आग लागल्याची बातमी आहे. वृत्तानुसार, या घटनेपूर्वी राहुल त्याच्या कुटुंबासह फरार झाला होता, हे सुदैवी आहे.


जमावाने आनंदचे घर लुटले

वृत्तानुसार, आनंद त्याची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यातून सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाले, पण हल्लेखोरांनी कलाकाराच्या घरात जे काही सापडले ते लुटले. जमावाने मौल्यवान वस्तू चोरल्या आणि आनंदच्या 3 हजारहून अधिक हस्तनिर्मित वाद्यांच्या संग्रहासह घराची नासधूस केली.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

एका यूजरने आनंदच्या बांगलादेशातील घराचे फोटो शेअर केले आहे. बांगलादेशी इंग्रजी भाषेतील दैनिक द डेली स्टारशी बोलताना आनंदच्या जवळच्या एका कौटुंबिक सूत्राने सांगितले की, हल्लेखोरांनी प्रथम गेट तोडले आणि नंतर घराची तोडफोड सुरू केली. “त्यांनी फर्निचर आणि आरशांपासून मौल्यवान वस्तूंपर्यंत सर्व काही पळवून नेले. यानंतर त्यांनी राहुल दा यांच्या वाद्यांसह संपूर्ण घराला आग लावली,” अशी माहिती सूत्राने वृत्तपत्राला सांगितले. संगीतकार, गीतकार आणि गायक राहुल आनंद ढाक्यामध्ये जोलार गान नावाचा लोकप्रिय स्थानिक बँड चालवतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube