50 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?; शेख हसिना भारतात डेरेदाखल

50 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार?; शेख हसिना भारतात डेरेदाखल

PM Sheikh Hasina : गेल्या महिन्याभरापासून बांग्लादेशात (Bangladesh) मोठ्या प्रमाणात हिंचासार सुरु आहे. या हिंसाचारामुळे शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे.  इतकेच नाही तर त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी देशही सोडावा लागला आहे.

सध्या बांग्लादेशात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयावर हल्ला केला. आंदोलकांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरातील फर्निचर तोडले तसेच शेख मुजीबुर रहमान (Shaikh Mujibur Rahman) यांचा पुतळा देखील आंदोलकांनी तोडले आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी याच मुजीब उर रहमान आणि त्यांच्या कुटुंबातील 18 सदस्यांची लष्करी उठावात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी फक्त शेख हसीना आणि शेख रिहाना वाचल्या त्याही भारताच्या मदतीने. आज पुन्हा एकदा शेख हसीना यांना भारताच्या आश्रयाला आहेत.

शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर भारताने दिला आश्रय 

1975 मध्ये त्यांचे वडील आणि बांग्लादेशचे तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर भारताने शेख हसीना यांना आश्रय दिला होता. 1975 च्या लष्करी उठावात शेख हसीना आणि रिहाना वाचू शकल्या कारण दोघेही 15 दिवस आधी बांग्लादेश सोडून जर्मनीला गेले होते. हसीना यांचे पती जर्मनीत राहत होते. 30 जुलै 1975 या दिवशी शेवटच्या वेळी हसिना आपल्या वडिलांना भेटल्या होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी लष्करी उठावात मुजीब उर रहमान यांची हत्या करण्यात आली होती. मात्र त्यावेळी हसीना यांना संपूर्ण कुटूंबाची हत्या करण्यात आली याची माहिती नव्हती.

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मुजीब कुटुंबातील दोन मुलींची काळजी वाटत होती. त्यांनी जर्मनीतील आपले राजदूत हुमायून रशीद चौधरी यांना हसीनाकडे पाठवले आणि तेव्हा इंदिरा गांधींशी हसीना बोलल्या. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेण्याचे ठरवले. त्यानंतर शेख हसीना आणि रिहाना यांना प्लॅनिंग करून भारतात आण्याची तयारी करण्यात आली आणि 25 ऑगस्ट रोजी शेख हसीना आपल्या पतीसह एअर इंडियाच्या विमानाने भारतात पोहोचले.

त्यानंतर त्यांना 56 रिंगरोड येथील सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत मिस्टर आणि मिसेस मजुमदार अशी ओळख देण्यात आली.

कडेकोट बंदोबस्तात हसीना दिल्लीत थांबल्या होत्या त्यानंतर शेख हसीना यांना पंडारा पार्कच्या सी ब्लॉकमधील तीन रूम असणाऱ्या घरात हलवण्यात आले तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी चौफेर बंदोबस्त देखील या घरावर तैनात करण्यात आले होते. तर शेख हसीना यांच्या पतीला नवी दिल्ली येथील अणुऊर्जा आयोगात नोकरी सरकारकडून देण्यात आली. तेथे त्यांनी सात वर्षे काम केले. यासोबतच सुरक्षेचे तीन नियम त्यांच्यासाठी करण्यात आले होते.

1. शेख हसीना यांनी घर सोडावे नाही.

2. त्यांना त्यांची खरी ओळख कोणालाही सांगण्याची गरज नाही.

3. दिल्लीत कोणाशीही संपर्क ठेवू नका

प्रणव मुखर्जी यांच्याकडे जबाबदारी 

त्यानंतर इंदिरा गांधींनी शेख हसीना यांची जबाबदारी प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवली होती. मुखर्जींनी कोणतीही कसर सोडली नाही आणि ही जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली. या काळात शेख हसीना फक्त प्रणव दासोबतच नाही तर त्यांच्या कुटुंबातही मिसळली होती. हसीना यांचा मुलगा जॉय आणि प्रणव दा यांचा मुलगा अभिजीत घट्ट मित्र बनले होते तसेच प्रणव दा यांची पत्नी देखील शेख हसीना यांची विशेष काळजी घेत होत्या. 2015 मध्ये जेव्हा प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या पत्नीचे निधन झाले तेव्हा शेख हसीना यांनी दिल्लीमध्ये येऊन कुटुंबाची भेट घेतली होती.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, शेख हसीना भारतात दाखल झाले आहे आणि आता ते लंडनला जाण्याची तयारी करत आहे. 50 वर्षांपूर्वी जर्मनीहून दिल्लीत आलेल्या हसिना यांना येथे सहा वर्षे काढावी लागली होती. 17 मे 1981 रोजी शेख हसीना आपल्या मायदेशी परतले होते.

बांग्लादेशात हिंसाचार अन् पंतप्रधान शेख हसीना यांना सोडावा लागला देश, ‘हे’ आहे कारण

यावेळी बांग्लादेशात लष्करी उठाव झालेला नाही आणि हसीना यांच्या कुटुंबाचे कोणतेही नुकसान झालेले नाही मात्र आरक्षणाच्या मुद्यावरून सुरु असणाऱ्या आंदोलनात शेख हसीना यांच्या जीवेला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शेख हसीना पुन्हा बेघर झाले आहे. त्यामुळे आता हसीना पुन्हा एकदा आपल्या मायदेशी कधी परतणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube