Download App

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

Bangladesh violence-बांग्लादेशमधील हिंदु मंदिरांची जमावाने तोडफोड केली आहेत. त्याचा फटका इस्कॉन मंदिरालाही बसलाय.

  • Written By: Last Updated:

Bangladesh violence: Hindu temples vandalised amid ongoing political unrest: आपला शेजारचा राष्ट्र बांग्लादेश (
Bangladesh) राजकीय अस्थिरतेमुळे अशांत झाला आहे. देशात वाढलेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधानपदावरून शेख हसिना (Shaikh Hasina) या पायउतार झाल्या आहेत. देश सोडून त्या सध्या भारतात आहेत. बांग्लादेशमध्ये हिंदू लोक अल्पसंख्याक आहेत. या राजकीय अस्थिरतेमध्ये आता अल्पसंख्यांकावर हल्ले सुरू झाले आहेत. तर अनेक हिंदू मंदिराची ( Hindu temples) तोडफोड करण्यात आली आहे. तर काही मंदिरांना आगही लावण्यात आली आहे. त्यामुळे हिंदू धर्मातील लोक संकटात आले आहेत.

Disqualification Mla Ncp & Shivsena : ‘तुम्हीच माझ्या जागेवर येऊन बसा अन् ठरवा’; सरन्यायाधीश पवार-ठाकरेंच्या वकिलांवर उखडले…

बांग्लादेशमधील मेहेरपूर येथील इस्कॉनच्या मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली आहे. तसेच मंदिरेही तोडण्यात आली आहेत. इस्कॉनचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद दास यांनी याबाबत माहिती दिली. मेहेरपूर येथील इस्कॉन मंदिराला आग लावण्यात आली आहे. तसेच जगन्नाथ, बलदेव आमि शुभद्रा देवी मंदिराचे तोडफोड करण्यात आली आहे. इस्कॉन मंदिरात तीन भाविक राहत होते. या भाविकांनी हल्लेखोरांपासून कशीबशी आपली सुटका करून घेतली आहे. चित्तगाव येथील इस्कॉनचे अध्यक्ष चिन्मोय दास यांनी मंदिराची सुरक्षेबाबत चिंचा व्यक्ती केली आहे. मंदिरांवरील हल्ले वाढले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु चित्तगावमधील तीन मंदिरावर हल्ला होऊन शकतो. हिंदु समाज आणि काही मुस्लिम समाजातील लोकांनी या मंदिरांचा बचाव केल्याचे दास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

VIDEO: युद्ध भडकणार ! इस्रायलवर हिजबुल्लाहकडून ड्रोन हल्ले; इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर

हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेच्या नेत्या काजोल देबनाथ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, सोमवारी चार हिंदू मंदिरावर हल्ले झाले आहेत. त्यात मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. ढाका येथील भारतीय सांस्कृतिक केंद्राला जमावाने आग लावली आहे. तसेच इंद्रिरा गांधी कल्चर सेंटरला आग लावण्यात आली आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाणीसाठी हे केंद्र उभारण्यात आले होते.

follow us