Download App

देश बंडखोरांच्या ताब्यात, आता सीरियाचं काय होणार?

Bashar Al Assad VS Abu Mohammed al Julani Crisis In Syria :जेव्हा कोणत्याही देशांत युद्ध होतं. तेव्हा शेकडो, हजारो लोकं मृत्युमुखी पडतात. तर लाखो बेघर देखील होतात. सर्वजण राजकीय अस्थिरतेनं होरपळून निघतात. याचाच परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर देखील होतो. पूर्व आशियातील एका देशात असाच 13 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. तब्बल 13 वर्ष जनता ही युद्धाच्या सावटाखाली होती. हा संघर्ष अचानक संपल्याचं समोर आलंय. राष्ट्राध्यक्ष थेट देश सोडून गेले (Syria Political Crisis) आहेत. एका बंडखोर नेत्याने 50 वर्षांच्या घराणेशाहीला पळता भूई थोडी करून सोडली आहे. नेमकं कोणत्या देशामध्ये हा राजकीय संघर्ष सुरू आहे? त्या देशात नेमकं काय घडतंय? हे आपण या विषय सोप्पा मधून जाणून घेऊ या.

इस्रायल आणि रशियाला धक्का बसला आहे. सीरियाची सत्तापालट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तिथलं युद्द संपायचं नाव घेत नव्हतं. अचानक अबू मोहम्मद अल जुलानी यांनी (Abu Mohammed al Julani) एक चाल खेळली अन् बाजीच पलटली. बशर-अल-असदची (Bashar Al Assad) राजवट संपु्ष्टात आणली. आता जुलानी सीरियाचा नवा चेहरा बनताना दिसत आहेत. पण हे जुलानी आहे तरी कोण? सिरीयाला नवीन ओळख देऊ पाहणारा नेता, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. अबू मोहम्मद अल-जुलानी यांची राजकीय कारकीर्द

असदची सत्ता संपवणारा बंडखोर कोण?

काही दिवसांपूर्वी अबू मोहम्मद अल जुलानी हजारो समर्थकांसह, खाकी कपड्यांमध्ये अलेप्पो किल्ल्याच्या पायऱ्या चढताना दिसले होते. हे चित्र सीरियातील जिहादी नेत्याचं होतं. ज्यांनी अवघ्या काही दिवसांतच हमा, होम्स आणि दमास्कस ताब्यात घेतले. असद घराण्याची 50 वर्षांची राजवट उखडून टाकली. 13 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात अचानक ट्विस्ट आलाय. नेमकं याचं कारण काय? असाच प्रश्न सर्वांना पडतोय. असदच्या सैन्याची अवस्था आधीच वाईट झाली होती. रशिया आणि इराणच्या पाठिंब्यानंतरही असदच्या सैन्याचं विघटन झालं होतं. परंतु जुलानी यांनी केवळ युद्धावर लक्ष केंद्रित केले नाही तर, गेली अनेक वर्षे त्याने प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलले होते.

श्रीलंकेचा पराभव अन् दक्षिण आफ्रिकेने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, WTC टेबलमध्ये फेरबदल

जुलानी यांचा ‘दडपशाहीविरोधात’ लढण्याचा निर्णय

अहमद हुसेन अल-शारा उर्फ ​​अबू मोहम्मद अल-जुलानी यांचा जन्म 1982 साली सीरियाची राजधानी दमास्कसमधील एका सुन्नी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय अरब कुटुंब होते. जुलानीचे बालपण सौदी अरेबियात गेलं. त्यांच्यावर सीरियन राजकारणाचा खोलवर प्रभाव होता. जुलानींचा जन्म झाला, तेव्हा सीरियाच्या राजकारणात गोंधळ उडाला होता. बशर अल-असदचे वडील हाफेज अल-असाद यांच्या सरकारने 1982 मध्ये होम्स आणि हमामध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या विरोधात मोठा नरसंहार केला. हजारो लोक मरण पावले आणि यामुळे सीरियाची धार्मिक आणि राजकीय गतिशीलता कायमची बदलली. याच काळामुळे जुलानी यांच्या कुटुंबात असद सरकारविरोधात संताप निर्माण झाला होता.

संजय मल्होत्रा ​​आरबीआयचे नवे गव्हर्नर, 11 डिसेंबरला स्वीकारणार पदभार

जुलानी यांचे कुटुंब 1990 च्या दशकात दमास्कसला परतले. 2000 मध्ये पॅलेस्टाईनमध्ये उठाव सुरू झाला. यावेळी जुलानी यांनी ‘अत्याचाराच्या विरोधात’ लढायचं ठरवलं. 2003 मध्ये अमेरिकेने इराकवर हल्ला केला तेव्हा अरब जगतात संतापाची लाट उसळली. त्यावेळी जुलानी अमेरिकन सैन्याविरुद्ध लढणाऱ्या बंडखोर गटांमध्ये सामील झाले होते. लहान सेनानी म्हणून जुलानींचे नाव इराकमध्ये प्रसिद्ध झाले. पण नशिबात काहीतरी वेगळंच होतं. अमेरिकन सैन्याने त्यांना पकडून ‘कॅम्प बुका’मध्ये कैद केलं होतं. 2011 मध्ये सीरियात बंडखोरी सुरू झाली होती. जुलानी यांनी कॅम्प बुका येथून मुक्त झाल्यानंतर सीरियात परतण्याचा निर्णय घेतला. सीरियात परतल्यानंतर त्यांनी अल-कायदाच्या पाठिंब्याने नव्या संघटनेची पायाभरणी केली. या गटाचं नाव ‘अल-नुसरा फ्रंट’ असं होतं. असद सरकार पाडणं आणि सिरियात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणं, हे या संघटनेचं स्पष्ट उद्दिष्ट होतं.

‘स्थानिक सीरियन बंडखोरीचा चेहरा’

जुलानी यांनी संघटनेला ‘स्थानिक सीरियन बंडखोरीचा चेहरा’ बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःला अल-कायदा आणि इसिसपासून 2013 मध्ये दूर केलं. 2017 मध्ये जुलानी यांनी मोठं पाऊल उचललं. त्यानंतर मात्र सीरियाच्या राजकीय नकाशावर मोठी उलथापालथ झाली. जुलानी यांनी आपल्या संघटनेची पूर्णपणे पुनर्रचना करत एचटीएस असं नाव ठेवलं. सीरियातील बंडखोर भागात शाळा, रुग्णालये आणि स्थानिक प्रशासन स्थापन केले होते. एचटीएसने रशिया आणि पाश्चात्य देशांशी थेट संवाद सुरू केला. आता केवळ ‘दहशतवादी’ नसून ‘राजकीय नेता’ असल्याचा संदेश जुलानी यांनी दिला. जुलानी यांच्या कूटनितीमुळे रशिया आणि इराणसारख्या बलाढ्य देशांचा पाठिंबा असलेले असद सरकार अवघ्या काही तासांत कोसळलं. जुलानी ही अशी व्यक्ती आहे, त्यांनी आपली रणनीती, बुद्धिमत्ता आणि कूटनितीने सीरियाचा राजकीय नकाशा बदलून टाकला.

सीरियाची पुढची राजकीय स्थिती कशी असेल?

सीरियात सरकारी नियंत्रणाबाहेर असलेला भूभाग आधीच बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवटीचा शेवट झाल्यामुळे सीरियातील या विविध भागांमध्ये कोणताही बदल होणार नाही.सीरियाचं पुढील राजकीय भवितव्य संघटनेचे हेतू आणि इतर प्रतिस्पर्धी बंडखोर गट यांच्यावरच अवलंबून असणार आहे. इराण, रशिया आणि तुर्की या प्रमुख बाह्य शक्ती आहे. इराण आणि रशियानं राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पाठिंबा दिला होता. तर तुर्कीनं बंडखोर गटांना पाठिंबा दिला होता. याबरोबरच सीरियाच्या भवितव्यामध्ये अमेरिकेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण सीरियाच्या पूर्व भागात अजूनही अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती आहे. सीरियाची पुढची राजकीय स्थिती हे फक्त येणारी वेळच ठरवणार आहे.

 

follow us

संबंधित बातम्या