Download App

Israel Airstrike in Syria : इस्त्राईलचा सिरीयात हवाईहल्ला; 36 जवान मारले, भयावह व्हिडीओ समोर

Israel Airstrike in Syria : एकीकडे इस्त्राईल हमास युद्ध सुरू असताना आता इस्त्राईलने सिरीयात हवाईहल्ला ( Israel Airstrike in Syria ) केला आहे. सिरीयातील अलेप्पा या शहराजवळ हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये
सिरीयाच्या सैन्यातील 36 जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचा एक भयावह व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Rameshwaram Cafe Blast चा आरोपी मुजम्मिल शरीफ एनआयएकडून ताब्यात; तीन राज्यांत 18 ठिकाणी छापे

या हल्ल्याबाबत सिरीयातील माध्यमांना सैन्याच्या अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितले की, एकीकडे देशातील विरोधी गटांनी अलेप्पा या शहराजवळ ड्रोन हल्ले केले आहेत. त्यातच आता इस्त्राईलने सिरीयात हवाईहल्ला केला आहे. मात्र सैन्यकडून यामध्ये कीती जवानांचा मृत्यू झाला याचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आलेला नाहाी. मात्र काहीा वृत्तांनुसार या हल्ल्यामध्ये सिरीयाच्या सैन्यातील 36 जवानांचा मृत्यू झाला आहे. मात्र याबाबत इस्त्राईल सैन्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक

य अगोंदर 18 मार्चला पाकिस्तानी वायूसेनेने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार आल्यापासून दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती वारंवार उद्भवत आहे. अफगाणिस्तानात तालिबान शासन येण्यात पाकिस्तानचाही हातभार होता. परंतु, तालिबानी सरकार आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याऐवजी अधिकच बिघडले होते.

Cannes Film Festival मध्ये तीन मराठी चित्रपटांची निवड; ‘जिप्सी’,’भेरा’ अन् ‘वल्ली’ ची वर्णी

सध्याच्या परिस्थितीत तालिबान सरकार भारत आणि पाश्चिमात्य देशांत संबंध सुधारण्यावर भर देत आहे. यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानला वाटते क तालिबानने त्याच्या इशाऱ्यावर काम करावे मात्र तालिबान सरकारने यास नकार देत स्वतःचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे की पाकिस्तानी विमानांनी आमच्या हद्दीत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात आमच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. पाकिस्तानी सैन्याने हे हवाई हल्ले अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात केले आहेत.

follow us