SA vs SL: दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला (SA vs SL 2024) मोठा धक्का दुसऱ्या कसोटी सामना 109 धावांनी जिंकला आहे. याच बरोबर दक्षिण आफ्रिकाने (South Africa) दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली आहे. पहिल्या सामन्यात आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला होता.
तर या सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) 109 धावांनी पराभव केला आहे. या विजयसह आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला (Australia) देखील मोठा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाने रविवारी ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर उडी घेतली होती. मात्र आता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का देत या स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे आणि भारत तिसऱ्या स्थावर पोहोचला आहे.
या स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ 63.33 च्या विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 60.71 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारतीय संघ 57.29 च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Australia’s reign at the top of the #WTC25 standings was short-lived as new leaders emerge after South Africa’s whitewash of Sri Lanka 👀 #SAvSL | Details 👇
— ICC (@ICC) December 9, 2024
‘बेळगाव कारवार’ केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; आदित्य ठाकरेंची CM फडणवीसांकडे मागणी…
तर दुसरीकडे श्रीलंकेविरुध्द झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेणाऱ्या डेन पीटरसनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली तर टेम्बा बावुमाला या कसोटी मालिकेसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. टेम्बा बावुमाने या मालिकेत 4 डावांमध्ये त्याने 81.5 च्या सरासरीने सर्वाधिक 327 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने एक शतक आणि 3 अर्धशतकेही झळकावली. या कसोटी मालिकेत टेंबाची सर्वोत्तम धावसंख्या 113 धावा होती आणि यादरम्यान त्याने 29 चौकार आणि 4 षटकारही मारले.
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं भर चौकात अपहरण…