वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ज्या खेळाडूवर रोहितने अविश्वास दाखवला तोच ठरला हिरो

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ज्या खेळाडूवर रोहितने अविश्वास दाखवला तोच ठरला हिरो

R Ashwin vs West Indies 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. लंडनमधील ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडिया 4 वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादवसह मैदानात उतरली होती. संघात रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकी गोलंदाज होता. या सामन्यात नंबर 1 कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले नव्हते. यानंतर अश्विनला या महत्त्वाच्या सामन्यात न खेळवल्याबद्दल बरीच टीका झाली होती.

आता तोच रविचंद्रन अश्विन डोमिनिकाच्या रॉसीयूमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा हिरो ठरला. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वाल (171) ही सामनावीर ठरली असली तरी. पण, खऱ्या अर्थाने अश्विननेच या सामन्यात भारताच्या विजयाचा पाया रचला. अश्विनने पहिल्या डावात 24.3 षटकात 60 धावा देत 5 बळी घेतले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 150 धावांवर गुंडाळला.

दुसऱ्या डावातही अश्विनने 21.3 षटकांत 71 धावांत 7 बळी घेतले. यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने 130 धावांवर शरणागती पत्करली. अश्विनच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने पहिल्या डावात 421 धावा करून डाव घोषित केला.

Aamir Khan चं चीन-पाकिस्तानवर जास्त प्रेम; ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकरी भडकले

रोहितची एक चूक महागात पडली
रोहितने WTC फायनलमध्ये अश्विनला संघात स्थान दिले नव्हतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात मोहम्मद सिराजने 5, मोहम्मद शमीने 4, शार्दुल ठाकूरने 2, उमेश यादवने दोन्ही डावात 2 बळी घेतले. त्याचवेळी एकमेव फिरकीपटू रवींद्र जडेजानेही 4 बळी घेतले. WTC च्या 2021-2023 सामन्यांमध्ये आर अश्विन हा भारताचा सर्वात यशस्वी (13 सामने 61 बळी) गोलंदाज ठरला आहे. एकूण गुणतालिकेत तो तिसरा होता.

रोहितने दिले होते हे कारण
अश्विनला WTC फायनलमध्ये संघात संधी का मिळाली नाही. याचे कारणही रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले. तो म्हणाला की आम्ही चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसोबत खेळणार आहोत. अश्विनसारख्या खेळाडूला बाहेर ठेवणे नेहमीच कठीण असते. तो मॅच विनर आहे, पण हा निर्णय संघाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आला आहे.

UCC : मित्र पक्षांनी वाढवलं भाजपचं टेन्शन; लोकसभा निवडणुुकांपूर्वी मोदी सरकार मोठ्या पेचात

दरम्यान तेव्हा सर्व क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितले होते की, रोहितने ओव्हलची ग्रीन टॉप पिच पाहून हा निर्णय घेतला आहे. मात्र, रोहितला त्याच्या निर्णयाचा आयुष्यभर पश्चाताप होईल. कारण ज्या फॉर्ममध्ये आर अश्विन होता ते पाहून त्यांची संघात जागा बसत होती.

अश्विनचे दुख:
त्याचवेळी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न खेळल्याने रविचंद्रन अश्विनलाही वेदना झाल्या होत्या. डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे अश्विनने सांगितले होते. डब्ल्यूटीसी फायनल जिंकणे आपल्या कारकिर्दीसाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचेही त्याने सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube