Download App

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

Twitter Logo Changed : ट्विटरचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी ताब्यात घेतल्यापासून यामध्ये सातत्याने काहींना काही बदल करत आहे. नुकतेच मस्क यांनी ट्विटरची निळी चिमणी असलेला लोगो बदलला होता. यामुळे युझर्सने त्यांना ट्रोल देखील केले. मात्र आता पुन्हा एकदा महत्वाची माहिती समोर आली आहे. ट्विटरचा लोगो (Twitter Logo) पुन्हा एकदा बदलला आहे. श्वानाच्या जागी आता पुन्हा एकदा निळी चिमणी (Blue Birdie) परतली आहे.

DOGE ट्विटरच्या होम बटणावरून काढून टाकल्यानंतर क्रिप्टोकरन्सी Dogecoin 9 टक्क्यांनी घसरली आहे. दरम्यान सोमवारी, ट्विटर वापरकर्त्यांना लोगोमध्ये शिबा-इनूचे म्हणजेच श्वानाचे कार्टून दिसले, जे प्रत्यक्षात क्रिप्टोकरन्सी डोगेकॉइनचा (Dogecoin) लोगो आहे. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या होम बटणावरील आयकॉनिक ब्लू-बर्ड लोगो परत आणला आहे.

मोबाईलची चार्जिंग 100 टक्के आहे धोक्याची

ट्विटर लोगो DOGE काय होता?
सॉफ्टवेअर अभियंते बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये बिटकॉइन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सीची चेष्ठा करण्यासाठी डॉजकॉइन सुरू केले. मस्क यांनी अनेकदा त्याचे आवडते क्रिप्टोकरन्सी म्हणून याचे वर्णन देखील केले आहे.

टीव्ही – रेडिओ पाठोपाठ आता ॲलेक्सा सांगणार मोदींची ‘मन की बात’

चॅलेंज पूर्ण केले…
मस्क यांनी ट्विटरवर एक जुना स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये आपणास दिसेल की, एका वापरकर्त्याने मस्कला गंमतीने सांगितले की मस्क यांनी ट्विटर विकत घ्यावे आणि त्याचा लोगो डोगे असा करावा. हा स्क्रिनशॉट शेअर करताना मस्क म्हणाला, मी आश्वासन दिल्याप्रमाणे कंपनीचा लोगो बदलून दाखवला आहे. थोडक्यात वापरकर्त्याने दिलेले चॅलेंज मस्क यांनी पूर्ण करून दाखवले आहे.

Tags

follow us