टीव्ही – रेडिओ पाठोपाठ आता ॲलेक्सा सांगणार मोदींची ‘मन की बात’

टीव्ही – रेडिओ पाठोपाठ आता ॲलेक्सा सांगणार मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करत असतात. आजवर तुम्ही मोदींचे हे भाषण टीव्ही व रेडिओवर ऐकले असेल, मात्र आता तुम्ही मोदींची मन की बात या सर्व गोष्टी ॲमेझॉन म्युझिक आणि ॲलेक्सावरही ऐकू शकणार आहे. तसेच देशी-विदेशी गाणी ऐकवणाऱ्या ‘ॲमेझॉन म्युझिक’ आणि ‘ॲलेक्सा’वर आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भाषणेही ऐकवली जाणार आहेत.

नेमकं काय आहे करार?
माहिती प्रसारण मंत्रालय आणि ॲमेझॉन यांनी याबाबत एक करार केला आहे ज्यानुसार या प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय महत्त्वाचे कार्यक्रम देखील उपलब्ध असणार आहे. या करारांतर्गत ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, ॲलेक्सा, ॲमेझॉन म्युझिक आणि ॲमेझॉन ई मार्केटप्लेसच्या माध्यमातूनही सरकारी कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहे. प्रकाशन विभागाची पुस्तके आणि कॅटलॉगसह, भारताच्या संस्कृतीवरील पुस्तके ॲमेझॉन ई-कॉमर्सवर उपलब्ध असतील. याशिवाय ॲमेझॉन म्युझिक आणि ॲलेक्साच्या माध्यमातूनही भारतीय संगीताची जाहिरात केली जाणार आहे.

अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या…राऊतांचा हल्लाबोल

याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, या भागीदारीमुळे उद्योग आणि शैक्षणिक यांच्यातील दुवा अधिक सुलभ होईल. करारानुसार, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि सादरीकरणाच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे प्रतिभावान कलाकारांचा संघर्षाचा काळ कमी होईल. याशिवाय Amazon Prime Video शिष्यवृत्तीही देणार आहे. नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सहकार्याने, ते विद्यार्थ्यांच्या कौशल्य निर्मितीला मदत करेल.

भ्रष्टाचाऱ्यांना शुध्द करुन भाजप त्यांना आपल्या पक्षात घेते…राऊतांची टीका

पुरस्कार विजेते भारतीय सिनेमे पाहायला मिळणार
‘इफ्फी’तील विजेते भारतीय चित्रपट, भारत आणि अन्य देशांच्या सहाकार्याने काढलेले चित्रपट हे या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळय़ात विजेते ठरलेले भारतीय चित्रपटही प्राईम व्हिडिओवर दाखवले जाणार आहेत. प्रसार भारती आणि एनएफडीसी यांच्याकडील संग्रहित चित्रपट, माहितीपट आणि भारतीय कलाकारांविषयीची माहिती जगभरात पोहोचवण्यासाठीही अॅमेझॉन ‘एनएफडीसी’बरोबर काम करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube