तुझेही रोशनी शिंदे सारखे हाल करू…ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला धमकी

तुझेही रोशनी शिंदे सारखे हाल करू…ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला धमकी

ठाणे : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना झालेल्या मारहाणीनंतर राज्याचे राजकारण तापले आहे. असे असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकारीला शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने फोनद्वारे धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. स्मिता आंग्रे (Smita Aangre) असे आरोप करणाऱ्या महिला पदाधिकारीचे नाव आहे. त्यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तर भोसले यांनी आपल्याविरोधात फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे आपले चारित्र्यहनन झाले असल्याचा आरोप करत आंग्रे यांच्यावर केला आहे.

नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊ
स्मिता आंग्रे या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा अधिकारी (उद्धव ठाकरे) पदावर काम करीत आहे. त्यांनी सांगितले की, मी अमित परबांच्या एका सोशल मीडिया पोस्टवर कमेंट केली. त्यानंतर मला रात्री अकरा वाजता नम्रता भोसले यांचा फोन आला. भोसले म्हणाल्या तू परब यांच्या पोस्टवर काय कमेंट केली? यावर बोलताना मी त्यांना सांगितले की यामध्ये मी तुमचा उल्लेख अथवा तुम्हाला कोठेही टॅग केलेले नाही आहे.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

त्यानंतर भोसले या चिडल्या व त्यांनी मला शिवीगाळ केली. तसेच रोशनी शिंदे हिची परिस्थिती काय झाली आहे माहिती आहे ना, अशीच परिस्थिती तुझी देखील होणार. बघ आता मी काय करते अशी धमकी भोसले यांनी मला दिले असल्याची माहिती स्मिता यांनी दिली आहे.

अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या…राऊतांचा हल्लाबोल

धमकी प्रकरणी मी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेले मात्र पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. आज मला अशा प्रकारच्या धमक्या येत आहे. उद्या माझ्या कुटुंबियांना काही झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल मी पोलिसांना केला मात्र त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाले असल्याची खंत यावेळी स्मिता यांनी बोलून दाखवली आहे. तसेच याप्रकरणी आपण पोलीस आयुक्तांना पत्र दिले असल्याचे आंग्रे यांनी सांगितले.

भोसलेंकडूनही तक्रार दाखल
शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी देखील स्मिता आंग्रे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्याविरोधात फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे आपले चारित्र्यहनन झाले असल्याचा आरोप भोसले यांनी आंग्रे यांच्यावर केला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी नम्रता भोसले यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube