अंडरवर्ल्डप्रमाणं शिंदे आणि फडणवीसांच्या टोळ्या…राऊतांचा हल्लाबोल

Untitled Design   2023 04 07T082010.697

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर ठाकरे गट व शिंदे – फडणवीस यांच्यामधील वाद वाढतच चालला आहे. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहे. यातच राज्यातील विरोधी पक्षांवर होणाऱ्या कारवाईवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. राज्यातील हे सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. अंडरवर्ल्ड प्रमाणं शिंदे आणि फडणवीस टोळ्या चालवतात अशी थेट टीका राऊतांनी केली आहे. राऊतांच्या या टीकेला भाजपचे गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा उल्लेख ‘फडतूस’ म्हणून केला होता. त्यानंतर उत्तराला प्रत्युत्तर दिले जाऊ लागले आणि आता पक्षातुन नेतेमंडळी देखील या वादात उतरले आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काडतूसने उत्तर दिलं असे म्हंटले होते. त्यांच्या या उत्तरला प्रत्युत्तर म्हणून राऊतांनी भिजलेली काडतूसं म्हणत फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहे. तुम्ही बेकायदेशीरोने काम करत आहे. हे सरकार नसून गुंडांना पाठीशी घालणं सुरु आहे. अंडरवर्ल्ड प्रमाणं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस टोळ्या चालवतात अशी जोरदार टीका राऊतांनी केलीय.

एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौऱ्यात भरगच्च कार्यक्रम : योगींनीही घरी बोलविले….

जनता जोकर म्हणून राऊतांकडे पाहते
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. महाजन म्हणाले, तुम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मंडी लावून बसले आहात. त्यातील मंत्री नवाब मलिक तसेच अनिल देशमुख हे कितीकाळ आतमध्ये होते व आणखी काहीजण त्यामार्गावर आहे. यामुळे तुम्ही बोलताना जरा विचार करत जा. राज्यातील जनतेचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. तसेच जनता तुमच्याकडे करमणुकीचे साधन तसेच जोकर म्हणून पाहते.

खात्यात पैसे नाही तरी UPI द्वारे पेमेंट होणार…जाणून घ्या कसे काय

बावनकुळे काय म्हणाले?
याच प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राऊतांवर टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले, त्यांची संघटना कमकुवत होत चालली आहे, त्यामुळे ते मानसिक दबावाखाली आहे. यातच त्यांचे सरकार गेल्याने ते अस्वस्थ आहे. यामुळे ते सामाजिक आणि राजकीय वातावरण खराब करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Tags

follow us