मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

Pakistan Blast: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता  आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

Pakistan Blast

Pakistan Blast

Pakistan Blast : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता  आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील शांतता समितीच्या कार्यालयात सोमवारी बॉम्बस्फोट (Pakistan Blast) झाला आहे. या बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर नऊ जण जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाना येथील स्थानिक शांतता समितीच्या कार्यालयात हा स्फोट झाला. अद्याप कोणत्याही गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्फोट इतका शक्तिशाली होता की कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. माहिती मिळताच, बचाव पथके आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी काम सुरू केले.

तर दुसरीकडे सोमवारी पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कारवाई करत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या 17 जणांना  ठार मारले. यासह, गेल्या तीन दिवसांत ठार झालेल्या सैनिकांची संख्या 71 झाली आहे. ही कारवाई उत्तर वझिरीस्तानमध्ये करण्यात आली.

Exit mobile version