पहलगाम हल्ल्यानंतर भारत अन् पाकिस्तानमध्ये तणाव; पंतप्रधान शहबाज शरीफांना बंधू नवाझ शरीफांचा महत्वाचा सल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर भारत अन् पाकिस्तानमध्ये तणाव; पंतप्रधान शहबाज शरीफांना बंधू नवाझ शरीफांचा महत्वाचा सल्ला

Nawaz Sharif on Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे संबंध आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांचे बंधू नवाझ शरीफ यांची भेट घेतली. (Terror) त्यांनी दोन्ही देशांमध्ये सध्या असलेली वर्तमान परिस्थितीबद्दलची माहिती त्यांना दिली. त्या भेटीत नवाज शरीफ यांनी लहान भाऊ शहबाज यांना भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिल्याचं सांगितले असल्याचं समजतय. रविवारी रात्री शहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांच्या भेटीसाठी त्यांचा उमरा निवासस्थानी पोहचले. या भेटीत संपूर्ण रिपोर्ट नवाझ शरीफ यांना शहबाज यांनी दिला. भारताने पाकिस्तानविरोधात कोणकोणती पावलं उचलली आहे, त्याची माहिती दिली.

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ होता का? पहलगाम हल्ल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान

बैठकीत शहबाज शरीफ यांच्याकडून सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर नवाझ शरीफ यांनी शांत राहण्याचा सल्ला दिला. तणाव निर्माण होईल, असं कोणतंही वक्तव्य मंत्री आणि अन्य नेत्यांनी भारतासंदर्भात करु नये, असे शरीफ यांनी म्हटले. युद्ध झाले तर पाकिस्तानचे सर्वाधिक नुकसान होईल. त्यामुळे शांत राहणं योग्य आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. शहबाज आणि नवाज यांच्या भेटी दरम्यान उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, नवाझ शरीफ यांचा प्रयत्न दोन्ही देशांमध्ये संवाद निर्माण करण्याचा आहे. भारताविरोधात कोणतेही आक्रमक धोरण स्वीकारण्यास नवाझ शरीफ तयार नसल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

भारताने सिंधू करार रद्द केल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होईल, त्याची माहिती शहबाज यांनी नवाझ शरीफ यांना दिली. दोन्ही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. त्यावर नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांकडे अण्वस्त्र असल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना आश्रय देणारे कधी विसरणार नाही? अशी कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube