दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ होता का? पहलगाम हल्ल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ होता का? पहलगाम हल्ल्याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान

Vijay Wadettiwar tatement On Pahalgam Terror attack : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) पहलगाम हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. पहलगाममध्ये 200 किलोमीटरपर्यंत आत दहशतवादी (Pahalgam Terror attack) येतात, हल्ला करतात. मात्र तिथे इंटेलिजन्सची चर्चा होत नाही. येथे दुर्दैवाने चर्चा हिंदू मुस्लिमची होतेत. ते आले कसे, घुसले कसे, तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता? जर सीमेवर अशी परिस्थिती आहे, तर राज्यात इथे आपण कोणाला बोलावं, असा सवाल काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

हिंदु आहे का, असं विचारून मारल्याचा आरोप पर्यटक करत आहेत. यावर वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, दहशतवाद्यांकडे इतका वेळ होता का, कानात येवून धर्म विचारणार. दहशतवाद्यांचा कोणता जात धर्म नसतो. या प्रकरणात दोषींवर त्वरीत कारवाई करावी. इतर कोणताही रंग देऊ नये, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

सद्यस्थितीत गोंधळलेली सरकारची स्थिती आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री आम्हाला कायदा व्यवस्था शिकवू नका, शांतता कशी राखायची आम्हाला ठाऊक असल्याचं सांगतात. योगेश कदम अन् नितेश राणे दोघेही मंत्रीपदावर आहेत. अशा कारणांवरून वाद होत असेल, तर हे किती गोंधळलेलं सरकार आहे. हे दिसतं आहे. मुख्यमंत्री म्हणतात पाकिस्तानचा एकही नागरिक नाही. दुसरीकडे नगर विकास खात्याचे मंत्रिमंडळ 107 पाकिस्तानी सापडत नाही. यामध्ये इतका समन्वयाचा अभाव सरकारमध्ये कसा असू शकतो? हे सरकार गोंधळी आहे हे स्पष्ट झालं आहे.

भाजप प्रपोगंडा चालवतंय, वक्फवरून AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा गंभीर आरोप

इतिहास पुसून नवा इतिहास लिहिण्याची काहीतरी ताकद तरी दाखवा. इतिहास हा झालेल्या घटनांची साक्ष असते. इतिहासात जे घडलं, तो ठेवा आपण जपत असतो. पण विषमता निर्माण करून किंवा दोन धर्मात दंगली निर्माण होईल, अशा प्रकारचा नव्या अभ्यासक्रमात समावेश करणे आणि तो इतिहास संपवीन. हे धर्मांधतेला खतपाणी घालण्यासारखं असल्याची टीका त्यांनी केलीय.

नरहरी झिरवळ सध्या मंत्री झालेत. त्यामुळे जरा पाहून आणि वाचून बोललं पाहिजे. पंधराशे रुपयात महिला खुश आहेत का? ते जिल्हा परिषद पालिका निवडणुकीत दिसतील. 2100 रुपये देणार हे जाहीरनाम्यात आहे, अशा भूमिका मांडून सरकारच्या नियतीत खोट आहे, हे स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केलीय.

केंद्राचा मोठा दणका! भारताविरूद्ध विष ओकणाऱ्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी

कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत आलाय. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातील अधिकारी करत नाही. ज्या विभागाला काम दिली जाते, तिथे सुद्धा कमिशन दिल्याशिवाय कामे निधी वितरित केलं जात नाही. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल, असं देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube